- मयूर पठाडेनियमित प्रवासाला जाणं, फिरायला जाणं, वर्षातून किमान एखादी फॅमिली पिकनिक काढणं.. या गोष्टी आता तशा नवीन राहिलेल्या नाहीत. अगदी सर्वसामान्य कुटुंबंही आता सर्रास प्रवासाला जातात. पूर्वी जसं प्रवासासाठी सव्यापसव्य करावे लागायचे, तसेही आता करायला लागत नाहीत. तुमची पिकनिक तुमची तुम्हाला अरेंज करायची, स्वत:च डेस्टिनेशन्स ठरवायची आणि आपल्या मनाप्रमाणे, जिथे जितक्या दिवस राहावंसं वाटेल, तितकं राहायचं, अशी टेलरमेड टूरही अनेक जण काढतात. त्यासाठीचे तयार प्लान्सही आजकाल बनवून मिळतात. तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील, तर त्यासाठीचं लोन द्यायलाही अनेक जण तयार असतात..थोडक्यात प्रवासाला जाणं हा काही तसा आता डोक्याला खुराक राहिलेला नाही. देशात जायचं असो किंवा अगदी परदेशात, त्यासाठी तुमच्याकडे पैसा असो वा नसो, कुठे जायचं हे नक्की होत नसेल, तर त्यासाठीची तयार मदत.. अशी सगळी काही सोय आजकाल होऊ शकते.त्यामुळे प्रवासाला जाणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र प्रवासाला जाण्यापूर्वी काही ठराविक गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, ती मात्र आजही घेतली जात नाही.त्यातल्या काही गोष्टी म्हटलं तर अगदीच प्राथमिक, पण अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या आपण जाणून घेतल्याच पाहिजेत.प्रवासाला, पिकनिकला तुम्ही कोणाहीबरोबर गेलेला असा, स्वत: किंवा ट्रॅव्हल एजन्सीबरोबर, एक गोष्ट कटाक्षानं पाळायला हवी, ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातोय, त्या ठिकाणचे आपण झालं पाहिजे. अगदीच कायापालट जरी नाही करता आला, तरी आपण टुरिस्ट आहोत, हे सहजासहजी कोणाला लक्षात यायला नको. तुम्ही ‘टुरिस्ट’ आहात, हे कळलं की काही वेळा अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. ज्या ठिकाणी आपण जाऊ, तिथे तुमचा ‘बकरा’ बनण्याचीही शक्यता असते. अनेक टुरिस्ट प्लेसेसवर त्यामुळेच पर्यटकांची लुटालुट होण्याचे प्रकार घडतात.ज्या ठिकाणी आपण जातो आहोत, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या सुरक्षेची आवर्जुन काळजी घ्या. ती आपल्यालाच घ्यावी लागते. किमान रात्रीच्या वेळी दरवाजा, खिडक्या बंद करणे, आपल्या महत्त्वाच्या वस्तु व्यवस्थित लॉक करणे.. अशा साध्या वाटणाºया गोष्टी.. पण त्या करायलाच हव्यात.प्रवासात अनेकांच्या बॅगा तुटतात. याचं मुख्य कारण म्हणजे नको इतका सोबत घेतलेला पसारा आणि घरातून निघताना घरात असेल ती बॅग उचलल्यामुळष असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्रवासासाठीची बॅग भक्कम आणि वेगळीच हवी.टूरमध्ये एन्जॉय करणं ठीक आहे, पण म्हणून एकदम ‘टल्ली’च झालं पाहिजे असं काही नाही. त्याचं तारतम्य अवश्य बाळगलं पाहिजे..तर निघा प्रवासाला, मस्त मजा करा, पण थोडीशी काळजी घ्या इतकंच..
फिरायला अवश्य जा, पण ‘टुरिस्ट’ म्हणून नको..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 4:58 PM
‘या’ गोष्टींची काळजी घ्या आणि आपला प्रवास संस्मरणीय करा..
ठळक मुद्देबाहेरगावी गेल्यानंतर आपण ‘टुरिस्ट’ आहोत, हे सहजासहजी कोणाला लक्षात यायला नको.सुरक्षेची आवर्जुन काळजी घ्या.प्रवासाची बॅग भक्कम आणि वेगळी असायला हवी.