- अमृता कदमआजकाल एकट्यानंच फिरायला निघणाऱ्या हौशी भटक्यांची संख्या वाढत आहे. आपली सवड पाहून स्वत:सोबत थोडा निवांत वेळ घालवता यावा, नव्या अनुभवांना कोणत्याही बंधनांशिवाय सामोरं जाता यावं म्हणून एकट्यानंच बाहेर पडण्याला पसंती दिली जाते. पण एकट्यानं फिरण्यातल्या थ्रीलची हौस भागवतानाच स्वत:च्या सुरक्षेचाही विचार करणं गरजेचं आहे. प्रवासात आपली काही गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच प्रवासात स्वत:ला जपण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुमच्या सामानात असणं आवश्यकच आहे.
2. पेपर स्प्रेसुरक्षेचा विचार करून अनोळखी ठिकाणी एकट्यानं फिरताना पेपर स्प्रे तुमच्या पर्समध्ये ठेवायला विसरु नका.
3. एअरपोर्ट कनव्हिनिअन्स अॅपविमानतळावर वेळेवर पोहचण्याचं टेन्शन, वेळेआधी पोहोचलो तर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आंओ उशीरा पोहचलो तर धावत-पळत सगळ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करायची हा अनुभव अनेकांना येतो. हे टाळण्यासाठी आणि तुम्हाला योग्य वेळेत पोहचवण्यासाठी अनेक एअरपोर्ट कनव्हिनिअन्स अॅप्स आहेत. शिवाय पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर पार पाडाव्या लागणाऱ्या गोष्टींची माहितीही तुम्हाला या अॅपमधून मिळते. 4. आरामदायी शूजप्रवासातल्या महत्त्वाच्या सामानाच्या यादीत शूजचं काय काम? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण प्रवासामध्ये मनसोक्त भटकत असतानाच तुमची शारीरिक उर्जा वाचवण्यासाठी चांगल्या शूजची नक्कीच मदत होते. शूज आरामदायी असतील तर तुम्ही हवं तितकं पायी भटकू शकता. तसंच प्रवासामध्ये पाय दुखणं किंवा पायाला गोळे येणं, असले त्रासही होत नाहीत. 5. पोर्टेबल बॅटरी चार्जरही गोष्ट अशी आहे, जी घ्यायला तुम्ही अजिबातच विसरु नका. एकट्यानं प्रवास करताना तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या, मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. दिवसभर बाहेर फिरताना तुम्हाला प्रत्येकवेळी तुमचा मोबाईल चार्ज करायला वेळ मिळेलच असं नाही. त्यामुळेच जेव्हा गरज पडेल तेव्हा मोबाईल चार्ज करता यावा म्हणून पोर्टेबल चार्जर जवळ असायलाच हवा.