IRCTC Tour Package: हिवाळ्यात पर्यटनाची मजाच काही निराळी असते. उत्तर भारतात दऱ्याखोऱ्यांमध्ये बर्फाच्या वर्षावाला सुरूवात होते आणि पर्यटन देखील वाढतं. आता नवं वर्ष देखील काही दूर राहिलेलं नाही. तुम्ही जर डिसेंबर आणि नव वर्षाच्या स्वागतावेळी काही पिकनिकचा प्लान करत असाल तर याकाळात उत्तर भारतात तेही हिमालयाच्या छत्रछायेत रम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासारखं दुसरं ठिकाण तुम्हाला सापडणार नाही. आता भारतीय रेल्वे आणि पर्यटन विभागानं देखील एक खास पॅकेज आणलं आहे. या पॅकेज अंतर्गत दार्जिलिंग, गंगटोक आणि कलिम्पोंगची सफर स्वस्तात करता येणार आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर या निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची संधी प्राप्त झाली आहे.
भारतीय रेल्वे आणि पर्यटन विभागानं या पॅकेजचं नाव Gangtok & Darjeeling असं ठेवलं आहे. हे पॅकेज एकूण ६ रात्र आणि ७ दिवसांचं असणार आहे. याअंतर्गत कलिम्पोंग, गंगटोक आणि दार्जिलिंगची सफर करता येणार आहे.
कलिम्पोंग, गंगटोक आणि दार्जिलिंग टूअर पॅकेज-पॅकेजचं नाव- Gangtok & Darjeelingडेस्टिनेशन कव्हर- कलिम्पोंग, गंगटोक आणि दार्जिलिंगट्रॅव्हलिंग मोड- फ्लाइटयात्रेची तारीख- ३० जानेवारी २०२२ ते ५ फेब्रुवारी २०२२फ्लाइट- इंडिगो एअरलाइन्सप्रवासाची तारीख- ३० जानेवारी २०२२ (मुंबईहून सकाळी ७.४५ वाजता उड्डाण आणि १०.३० वाजता बागडोगरा लँडिंग)परतण्याची तारीख- ५ फेब्रुवारी २०२२ (बागडोगराहून ११.१० वाजता उड्डाण आणि २.४० मिनिटांनी मुंबईत लँडिंग)
आयआरसीटीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील या पॅकेजची सविस्तर माहिती दिली आहे. यासाठीचा फोन नंबर आणि इतर संपूर्ण माहिती यात देण्यात आली आहे. पॅकेजच्या एकूण किमतीसह संपूर्ण माहिती तुम्हाला यात मिळून जाईल. यात तुम्ही १ रात्र कलिम्पोंग, ३ रात्र गंगटोक आणि २ रात्र दार्जिलिंगमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली आहे.