- अमृता कदमबुलेटसारखी ‘रॉयल’ बाइक घ्यायची, किक मारायची आणि सुसाट निघायचं आणि तेही हिमालयाच्या रांगांमधून! एकदम कूल आणि थ्रीलिंग वाटतंय ना! हिमालयामधल्या बाइक ट्रीप्स या आजकालच्या तरूणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मनालीमधून भाड्यानं बाइक घ्यायची आणि पुढचा सगळा प्रवास हिमालयाच्या रांगांना एका बाजूला ठेवत करायचा. हे वाचताना किंवा ऐकताना जितकं भारी वाटतंय, तितकेच त्यात धोकेही खूप आहेत. त्यामुळे केवळ साहसाची आवड एवढ्याच भांडवलावर या प्रवासाला निघणं हे केव्हाही घातक ठरु शकतं. ही बाइक राइड तुमच्या शारीरिक आणि मानिसक क्षमतांचा कस पाहणारी असते.‘अत्यंत उंचावर गेल्यावर अनेक जणांना चक्कर येते किंवा श्वसनाचा त्रास व्हायला लागतो. कारण त्यांना या प्रवासाची नीट माहिती नसते, योग्य ते साहित्य सोबत नसतं. त्यांना केवळ लेहला जाण्यासाठी बाइक हवी असते’, मनालीमधल्या बाइकर मोक्षा जेटलींचं हे निरीक्षण आहे.त्यामुळेच स्वत: प्रोफेशनल बाइकर असलेल्या मोक्षा हिमालयात बाइकवरून प्रवासाला निघताना नेमकी काय काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन करतात. त्यांच्या मते साहसाची आवड असण्यात गैर नाही. पण त्या साहसाला सावधगिरीचं भान असेल तरच तुम्ही हिमालयातल्या बाइक रायडिंगचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
2) रस्ते प्रवासासाठी खुले आहेत का याची आधी नीट माहिती करून घ्या. कारण बर्याचदा लोकं बाइकवरून रोहतांगपर्यंत जातात आणि तिथं गेल्यावर कळतं की रोहतांग पास अजून प्रवासाला खुलाच झालेला नाही. त्यामुळे नेहमी अशा रोड ट्रीप करणार्या मनालीतल्या बाइक क्लबकडून इथल्या प्रवासाच्या योग्य काळासंबंधी आणि रस्ते नेमके खुले कधी असतात यासंबंधी माहिती घ्या.
3) जर तुम्ही लेहला जाण्याचा प्लॅन करत असला तर तिथल्या थंड हवामानाची आणि इतक्या उंचावर राहण्याची तुमच्या शरीराला सवय होणं गरजेचं आहे. म्हणूनच आधी मनालीला दोन-तीन दिवस थांबा. शरीराला हिमालयातल्या वातावरणाशी जुळवून घेऊ दे आणि मगच पुढच्या प्रवासाला निघा. म्हणून तुमच्या प्रवासाच्या नियोजनात हा वेळही गृहित धरा.
4) प्रवासात जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्थानिक लोकांशी संवाद साधत रहा. तुम्ही विश्रांतीसाठी थांबल्यावर काय खावं-प्यावं किंवा साधारण प्रवासातल्या पुढच्या ठिकाणांची माहिती, तिथलं वातावरण कसं असेल, यासंबंधी स्थानिक लोक जितकी अचूक माहिती देतील तितकी तुमची उपकरणं आणि अॅपही देणार नाहीत कदाचित.
5) तुम्ही ट्रीपला जाण्याआधी बर्फ पूर्णपणे वितळून हिमालयातले रस्ते खुले झाले असतील याची खातरजमा करु न घ्या. जूनमध्ये इथल्या अनेक खिंडी खुल्या होत असल्या तरी जुलैपर्यंत बर्फ पूर्णपणे वितळत नाही. त्यामुळे इथे रोड-ट्रीप प्लॅन करण्यासाठी सर्वांत योग्य काळ म्हणजे जुलै-आॅगस्ट.
6) कँपिंगसाठीची साधनं सोबत ठेवू नका. हिमालयात एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर तुम्ही टेन्टमध्ये नाही राहू शकत. कारण इथली थंडी गोठवून टाकणारी असते आणि उंचावर आॅक्सिजनही विरळ होत जातो. म्हणूनच मुक्कामासाठी छोटं हॉटेल, गेस्ट हाऊस किंवा होम स्टेचा पर्याय निवडा.
7) तुमच्या सोबत कमीत कमी सामान ठेवा. जास्त सामान लादून पर्वतीय प्रदेशांमध्ये गाडी चालवणं अवघड होतं. ज्याला रूढार्थानं रस्ता म्हणता येईल असेही मार्ग कधीकधी इथे नसतात. म्हणून सोबत आवश्यक तेवढंच सामान ठेवा.
8) प्रवासात उत्तम शूज सोबत असणं गरजेच आहे. लांब पल्ल्याच्या बाइकिंगसाठी स्पोर्टस शूजपेक्षाही हायकिंग शूज हे अधिक उत्तम ठरतात. प्रवासाला निघताना चांगल्या ब्रॅण्डच्या हायकिंग शूजची खरेदी ही तुमच्या सुरक्षितेसाठीची खात्रीलायक गुंतवणूक ठरते.
9) हिमालयातल्या रोड ट्रीपमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला हवं तेव्हा आणि हवं ते खायला मिळेल याची काही खात्री नाही. त्यामुळे सोबत थोडासा सुका मेवा, एनर्जी बार, चॉकलेट आणि थोडाफार कोरडा खाऊ ठेवा. म्हणजे भुकेमुळे प्रवासाचा वेग मंदावणार नाही किंवा कसलाही त्रास होणार नाही.
10) उत्तम प्रतीचे बॉडी-वॉर्मर्सही तुमच्या सामानात गरजेचे आहेत. कारण आपल्या इथल्या तापमानात आणि हिमालयातल्या तापमानात कमालीचा फरक असतो. शिवाय गाडीवरून प्रवास करताना गारठा जास्त झोंबतो.
11) एरवीही प्रवासाला जाताना फर्स्ट एड-बॉक्स सोबत असणं चांगलं. मग अडव्हेंचरस ट्रीपला जाताना फर्स्ट-एड-बॉक्स हवाच! त्यामध्ये डेटॉल किंवा सॅव्हलॉन, बँड एड, बँडेजेस, डोकेदुखी, पोटदुखी, अॅलर्जीवरची बेसिक औषधं ठेवा.
12) हिमालयातलं हवामान आणि रस्त्यांची स्थिती यांचा अंदाज लावणं अतिशय अवघड. मोक्षा जेटली जवळपास दहा वर्षांपासून इथल्या रोड ट्रीप आयोजित करतात. पण तरीही त्यांना तिथल्या हवामानाचा अंदाज येत नाही आणि कधीकधी अनपेक्षित प्रसंग समोर येतात.
13) सर्वांत शेवटची पण महत्त्वाची सूचना. भन्नाट वेगानंबाईकवरु न जायला अनेकांना आवडत. पण या सवयीला हिमालयातल्या रोड ट्रीपमध्ये आवर घालावी लागेल. कारण इथले रस्ते अत्यंत कठीण आहेत. शिवाय हिमालयातलं नाजूक पर्यावरण. नको ते साहस तुमच्या जीवावर बेतू शकतं.