Horrible : पुण्यातील ‘या’ भूतांच्या ठिकाणांविषयीचे खरे गुपित माहित आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 12:29 PM
पुण्यात असेही काही ठिकाणे आहेत, त्याबाबत आपणास अजुनही अर्धवट माहिती आहे....
-Ravindra Moreविशेषत: भूतांची गोष्ट ऐकल्याने प्रत्येकजणांच्या अंगावर शहारे येतात. मात्र यांच्यातील काही लोक असेही असतात जे न घाबरता अशा भयावह ठिकाणांच्या शोधात जात असतात. जवळपास होणाऱ्या असाधारण हालचाली लोकांना घाबरवितात, ज्यामुळे लोकांमध्ये सर्वात जास्त सन्नाटा पसरतो. मात्र जर आपण भूतांना घाबरत असाल तर अशा ठिकाणी जाणे टाळावेच. पण जे लोक निडर आहेत आणि ज्यांना भूतांच्या ठिकाणांना भेट देणे आवडते अशांसाठी आम्ही आपणास पुणे येथील काही भूतांच्या ठिकाणांची यादी देत आहोत, जे ठिकाणे अतिशय भयावह आहेत. १) व्हिक्ट्री थिएटरविशेषत: रात्रीच्या वेळी याठिकाणी भूतांचा आवाज येतो. याठिकाणी लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी दिवसभर चित्रपट दाखविले जातात. मात्र रात्रीच्या वेळी याठिकाणी भूतांचा उत्सव सुरू होतो. तेथिल खुर्च्यांचा, दरवाज्यांचा आवाज, तसेच जोरजोराने आणि किंचाळणारे आवाज या थिएटरमध्ये रात्री आपणास ऐकू येऊ शकतात. यासाठी पुण्यातील भूतांच्या ठिकाणांपैकी हे एक मानले जाते. २) सिंहगढ किल्ला सिंहगढ किल्ला सध्या एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते, जे पुण्यापासून किमान ४० किमीच्या अंतरावर स्थित आहे. या जून्या किल्ल्याविषयी अनेक भयावह कथा प्रचलित आहेत. येथील रहिवासी सांगतात की, त्यांना याठिकाणी युद्ध आणि युद्धभूमिवर होणारे आवाज ऐकू येतात. त्यांचे म्हणणे आहे की, हा आवाज त्या सैनिकांचा आहे, जे युद्धादरम्यान मारले गेले होते. या किल्ल्याशी संबंधीत अजून एक कथा एका दुर्घटनेची आहे, जी याच किल्ल्यात घडली आहे. काही वर्षांपूर्वी याठिकाणी एका बस अपघातात कित्येक मुलांचा मृत्यु झाला होता. काही पर्यटक आणि गावाच्या रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांनी किल्ल्याच्या त्याठिकाणी मुलांच्या किंचाळ्या ऐकल्या आहेत ज्याठिकाणी हा अपघात झाला होता. ३) शनिवार वाडापेशवांचा महल म्हणजे शनिवार वाडा पुण्यामध्येच स्थित आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटामुळे शनिवार वाडा अजून प्रकाशझोतात आला. विशेष म्हणजे शनिवार वाडा भूतांचे स्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे, ज्याठिकाणी कित्येक असाधारण हालचाली होण्याच्या चर्चा केल्या जातात. चर्चेनुसार, याठिकाणी पेशवा बालाजी बाजीरावाचा मुलगा नारायण रावाचा आवाज ऐकायला येतो. असे म्हटले जाते की, याच ठिकाणी नारायण रावाची हत्या करण्यात आली होती आणि हत्या करण्याअगोदर शेवटचे शब्द होते, ‘काका मला वाचवा...’ आणि हेच शब्द अजूनही याठिकाणी ऐकायला येतात. ४) चंदन नगरआपण ‘ऐनाबेले’चा ‘ऐनाबेले गुडिया’ हा इंगजी चित्रपट पाहिला आहे का? चंदन नगरातही या चित्रपटाप्रमाणेच त्याच्यातील बाहुलीप्रमाणे एका लहानशा मुलीचे भूत पाहण्यात आले आहे. याठिकाणच्या रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांनी रात्री एका लहानशा मुलीला पांढरा फ्रॉक परिधान करुन फिरताना पाहिले आहे. असे म्हटले जाते की, हा त्याच मुलीचा आत्मा आहे, जी काही वर्षांपूर्वी कन्स्ट्रक्शन साइटवर मारली गेली होती. चंदन नगरला पुण्यातील टॉप भूतांच्या ठिकाणांपैकी एक समजले जाते. ५) खडकी युद्धाचे कब्रस्थानखडकी हे लढाईचे युद्ध क्षेत्र होते, जे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये लढले गेले होते. विशेष म्हणजे खडकी युद्धात जे सैनिक मारले गेले त्यांना हे ठिकाण समर्पित आहे. लोकांचे म्हणणे आहे की, युद्धात मृत्यु झालेल्या सैनिकांचे आत्मांना याठिकाणी भटकताना पाहण्यात आले आहे. हे ठिकाणही पुण्याच्या भूतांच्या ठिकाणांमधले एक आहे. Also Read : आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का?