- अमृता कदमपरदेशी फिरायला जायचं स्वप्न अनेकांचं असतं. पण त्यासाठी केवळ पासपोर्ट असून भागत नाही. एखादा बेत आखल्यावर व्हिसा कधी मिळतोय याची वाटही बघत बसावी लागते. प्रत्येक देशाच्या धोरणानुसार व्हिसाचे नियम बदलत असतात. त्यामुळे कधीकधी व्हिसा वेळेवर न मिळाल्यानंही बेत रद्द करायची वेळ येऊ शकते. पण असेही काही देश आहेत, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा आॅन अरायव्हल’वर जाऊ शकता.अंटार्कटिकाअंटार्कटिका हा बर्फाळ प्रदेश म्हणून आपल्याला परिचित आहे. इथली बर्फाची अद्भुत दुनिया अनुभवायची असेल तर त्यासाठी व्हिसाची बिलकुल गरज नाहीय. इथे पर्टनसाठी साऊथ आइसलॅण्ड, रोझ आइसलॅण्ड, लेक वोस्टोक यासाठी अनेक सुंदर ठिकाणं उपलब्ध आहेत.
ब्रिटिश वर्जिन आइसलॅण्डहे कॅरेबियन समुद्रात वसलेलं एक बेट आहे. या ठिकाणीही तुम्ही व्हिसा नसताना आरामात पोहचू शकता. या बेटाची राजधानी असलेलं रोड टाऊन हे ठिकाण तर अतिशय सुंदर आहे. शिवाय वर्जिन गोर्डा, बीफ आर्यलण्ड हीदेखील आवर्जून बघण्यासारखी स्थळं आहेत.
कंबोडिया
दक्षिण पूर्व आशियामध्ये वसलेला हा देश आहे. सीम रोप, कोह रोंग आयर्लण्ड ही इथली प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. केवळ निसर्गसौंदर्यच नाही तर इथली बौद्ध मंदिरंही पाहण्यासारखी आहेत. या मंदिरांतून मन:शांतीची एक वेगळीच अनुभूती मिळते.कूक आइसलॅण्ड
दक्षिण पॅसिफिक समुद्राच्या तीरावर वसलेला हा देश आहे. कूक आइसलॅण्ड हा 15 बेटांचा समूह आहे. इथलं अद्भुत वन्यजीवन अगदी आवर्जून पाहण्यासारखं आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला व्हिसाची अट अजिबात नाहीये.
फिजीहा देश म्हणजे एक बेटच आहे, जे पॅसिफिक समुद्रामध्ये वसलेलं आहे. नादी, सूवा लौटोका, लाबासा ही फिजीतली सुंदर शहरं पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र बनलेली आहेत.
ग्रेनाडाकॅरेबियन सागराच्या किनारी वसलेला हा देश म्हणजेही एक बेटच आहे. याला ‘आइसलॅण्ड आॅफ स्पाइस’ म्हणजे ‘मसाल्यांचं बेट’ म्हणतात. ग्रेनाडाची राजधानी असलेलं सेंट जॉर्ज हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे.
वानूआतू
पॅसिफिक समुद्रात वसलेला हा देश म्हणजे एक समुद्री बेटच आहे. वानूआतू मध्ये फिरण्यासाठी पोर्ट व्हिला हे राजधानीचं शहर, पेले आइसलॅण्ड , लुगानविले अशी विविध स्थळं आहेत. या ठिकाणी फिरायला तुम्हाला व्हिसाची आवश्यकता नाही.
तुर्क अॅण्ड काइकोस आइसलॅण्ड
कॅरेबियन समुद्रात वसलेलं हे एक बेट आहे. तुर्क अॅण्ड काइकोस बेटावर फिरण्यासाठी ग्रॅण्ड तुर्क आइसलॅण्ड, पाईन ही ठिकाणं आहेत. व्हिसा नसतानाही तुम्ही या ठिकाणी अगदी आरामात फिरु शकता.
थायलंडथायलंड हा दक्षिण पूर्व आशियातला एक देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. बँकाँक, पटाया यासारखी सुंदर शहरं पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहेत. शॉपिंग आणि बौद्ध संस्कृती ही थायलंडच्या पर्यटनाची खास वैशिष्ट्यं आहेत.
त्रिनिदाद आणि टोबॅगोदोन बेटांनी मिळून हा देश बनलाय. क्रि केटमुळे हे नाव ब-याचदा चर्चेत असतं, कारण वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू इथलेच आहेत. पोर्ट आॅफ स्पेन ही या देशाची राजधानी. सेंट अगस्टाईन, पॉर्इंट फोर्टिन ही इतर शहरंही अगदी रमणीय ठिकाणं आहेत.
मकाऊमकाऊ हा पीपल्स रिपब्लिक आॅफ चायनाचा भाग आहे. मकाऊ हे जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. इथले टॉवर, गॅलेक्सी मकाऊ ही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. इथलं सर्वांत महत्त्वाचं आकर्षण म्हणजे इथले कॅसिनो. इथे येण्यासाठी तुम्हाला व्हिसाची आवश्यकता भासत नाही.
माइक्रोनेसियापश्चिम पॅसिफिक समुद्रात वसलेलं हे बेट आहे. या ठिकाणी कोलोनिया, चूक लगून ही हनीमूनसाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत. व्हिसा नसतानाही तुम्ही इथल्या बीचवर अगदी खुलेआम पर्यटनाचा आनंद लुटू शकता.
नेपाळ
भारताचा हा शेजारी देश पूर्वीपासून पर्यटनासाठी महत्वाचं केंद्र राहिलेला आहे. हिमालयाचं सान्निध्य, माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वांत उंच शिखर यांमुळे विदेशी पर्यटकांची नेपाळला कायम वर्दळ असते. काठमांडू, पोखरा, पशुपतीनाथ मंदिर, नगरकोट, चितवन नॅशनल पार्क, धूलीखेल यासारख्या अनेक ठिकाणांना दरवर्षी भारतीय पर्यटकांची गर्दी उसळत असते.
सेंट विन्सेंट अॅण्ड ग्रेनाडीन्सकॅरेबियन समुद्राच्या पूर्व किना-यावर वसलेला हा देश. कॅरेबियन समुद्र अटलांटिक समुद्राला ज्या ठिकाणी मिळतो त्याच ठिकाणी हा देश वसलाय. सेंट विन्सेंट, ग्रेनाडीन्स यासारखी अनेक ठिकाणं पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहेत.
मॉरिशसहिंद महासागरात वसलेलं हे एक बेट. पोर्ट लुई हे मॉरिशसचं राजधानीचं शहर अत्यंत रमणीय असं ठिकाण आहे. ब्लॅक रिवर जॉर्ज नॅशनल पार्क, ग्रँड बे, कसेला पक्षी उद्यान, फोक म्युझियम आॅफ इंडियन माइग्रेशन यासारख्या अनेक ठिकाणांना तुम्ही व्हिसा नसतानाही भेट देऊ शकता.सेंट किट्स अॅण्ड नेविस
दोन बेटांचा समूह असलेल्या या देशाचा वेस्ट इंडिजमध्ये समावेश होतो. सॅण्डी पॉइंट टाऊन, चार्ल्स टाऊन ही या ठिकाणची सर्वात सुंदर ठिकाणं आहेत. इथे येण्यासाठी तुम्हाला व्हिसाची आवश्यकता भासत नाही.
जॉर्डनपश्चिम आशियात वसलेलं हे एक अरब राष्ट्र आहे. अम्मन ही जॉर्डनची राजधानी. अकाबाचा किनारा, अल साल्ट, मदाबा या ठिकाणी व्हिसा नसतानाही तुम्ही आरामात फिरु शकता.