भटकंती करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी सध्याच्या काळात अनेक ठिकाणं उपलब्ध होत आहोत. अनेक विविध सोशल साईट माध्यामातून अनेक ठिकाणांची माहिती मिळत असते. तुम्हाला सुदधा अनेक ठिकाणी जाण्याची इच्छा असते. पण पासपोर्ट आणि व्हिसा नसल्यामुळे जाता येत नाही. पण आता जर तुमच्याकडे व्हिसा नसेल तर तुम्हाला टेंन्शन घेण्याचे काहीही कारण नाही. भारताच्या जवळपास असलेल्या काही देशात जाऊन तुम्ही पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिसा नसताना सुद्दा पोहोचता येईल.
मॉरिशस
मॉरिशयस हे फिरण्यासाठी खूप खास ठिकाण आहे. या ठिकाणी असलेले झरे आणि निसर्ग सौंदर्य पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल भारतीय पर्यटक या ठिकाणी पासर्पोटसह ९० दिवस थांबू शकतात. मॉरिशसमध्ये विविध मॉल्स, लहानमोठी सुपरमार्केट्स असली तरी आठवडी बाजारही भरतो. स्थानिक भाषेत त्याला ‘ला फॉयर’ म्हणतात. आठवडय़ातल्या ठरावीक दिवशी भाजी-फळं आणि ठरावीक दिवशी कपडे, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू मिळतात. तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाऊ शकता. (हे पण वाचा-पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या )
नेपाळ
नेपाळ हा सुंदर पर्यटन स्थळ असलेला देश आहे. तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्हाला नेपाळला जाता येईल. नयनरम्य पर्वत या ठिकाणी आहेत. नेपाळमधील काठमांडूमध्ये तुम्हाला फिरण्यासाठी खूप स्थळं आहेत. नेपाळमधील पोखरा या शहरात सर्वात फेमस फेवा तलावामध्ये तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता. बोटिंग करण्यासोबतच सुंदर डोंगर पाहता येतात. खास गोष्ट म्हणजे, या तलावाचं पाणी काचेप्रमाणे स्वच्छ आहे. तसंच नदिच्या किनाऱ्यावर असलेल्या डोंगरावरून तुम्ही गावाच्या अद्भुत प्रकृतीचा आनंद घेऊ शकतात. याव्यतिरिक्त वाइल्डलाइफही अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला निसर्गाची वेगवेगळी रूपं अनुभवता येतील. (हे पण वाचा- ट्रेनचा प्रवास आरामदायक होण्यासाठी 'या' टीप्स नक्की ठरतील फायदेशीर )
मालदिव
भारतीय पर्यटकांना मालदीवला व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळते. मालदीवला जाण्यासाठी आधी व्हिसा तयार करण्याची गरज भासत नाही. मालदीवला पोहोचल्यावर पासपोर्ट दाखवून तुम्ही व्हिसा मिळवू शकता. मालदीवकडे पर्यटकांचा ओढा वाढण्याचं हेही एक कारण आहे. मालदीवचे समुद्र किनारे अत्यंत स्वच्छ असल्यानं तिथं पोहण्याचा पुरेपूर आनंद तुम्ही लुटू शकता. तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वॉटर स्पोर्ट्स आणि अंडर वॉटर एक्टिव्हिटीज देखील तिथं आहेत.
भूटान
परदेशी ठिकाणे, नैसर्गिक सौंदर्य असणारी ठिकाणे पाहण्याबरोबरच धार्मिक पर्यटनही मोठ्या प्रमाणात होत आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला भूतान हा लहानसा देश आहे. भारत आणि चीनच्या मधला अत्यंत सुंदर पर्यटन स्थळं असलेला हा देश आहे. पर्यटकांना पारो, थिम्पू आणि पुनाखा या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेता येईल.
फिजी
फिजी या ठिकाणाची ओळख या ठिकाणचे सुंदर बीच आहेत. इथले बीच संपूर्ण जगभरात प्रसिध्द आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला येत असतात.
कंबोडीया
या ठिकाणी असलेल्या ऐतिहासीक वास्तु हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवतात. आशिया खंडातील सुंदर ठिकाणांपैकी हे स्थळ आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला फारसा खर्च येणार नाही. या ठिकाणी पोहोचण्यासाठी ई- व्हिसाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.