(Image Credit : Sid the Wanderer)
राजस्थानचं नाव येताच डोळ्यांसमोर उभे राहतात, इतिहासाचा दाखला देणारे ऐतिहासिक महाल, किल्ले आणि हवेल्या. राजस्थानमध्ये गेल्यावर तेथील प्रत्येक वास्तू आपल्याला इतिहासाची ग्वाही देत असते. देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं असलेलं राज्य असलेलं राजस्थान पर्यटकांमध्येही प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात येथी बीकानेर जिल्हाची एक वेगळी ओळख आहे. येथील वास्तूकलेसोबतच खाद्यसंस्कृतीही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते. हा जिल्हा राव बिकाने वसवलेला होता. तसं पाहायला गेलं तर या जिल्ह्याची ओळख ऐतिहासिक हवेल्या आणि राजेशाही घराणेशाहीसाठी ओळखला जातो. येथील ऐतिहासिक संस्कृतिचा अनुभव घेण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक येत असतात.
(Image Credit : Tour My India)
1. ऐतिहासिक आणि सुंदर हवेल्या
बीकानेरमध्ये असलेल्या राजा-महाराज्यांच्या हवेल्या आणि महाल आपली ऐतिहासिक संरचना आणि वास्तूकलेचा उत्तम नमुना आहेत. या हवेल्यांमध्ये आकर्क वास्तुकला आणि नक्षीकाम पाहण्यासाठी पर्यटक दूरवरून पाहायला येत असतात. येथील अधिकाधिक हवेल्या लाल रंगाच्या आहेत. बीकानेरमधील ऐतिहासिक हवेल्या आणि महाल पाहण्यासाठी येथील पर्यटक टांग्यामधून फिरत असतात.
(Image Credit : Tour My India)
2. रंग बदलणाऱ्या हवेल्या
बीकानेरमधील हवेल्यांची खासियत म्हणजे, या सूर्य प्रकाशानुसार आपला रंग बदलते. तुम्ही जर या हवेल्या सकाळच्या उन्हामध्ये पाहिल्या तर त्यांचा रंग वेगळा दिसतो आणि तुम्ही जर संध्याकाळच्या सौम्य सुर्यप्रकाशात पाहिलं तर यांचा रंग तुम्हाला वेगळा दिसेल. याव्यतिरिक्त या हवेल्यां तयार करण्यात वापरण्यात आलेल्या विटांमुळे यांचं सौंदर्य आणखी बहरतं. सुरक्षेच्या दृष्टीने या हवेल्या अत्यंत मजबुत तयार करण्यात आल्या आहेत.
(Image Credit : livemint.com)
3. भव्यतेचं प्रतिक आहेत या हवेल्या
बीकानेरच्या हवेल्यांना अत्यंत विशाल आणि भव्य तयार करण्यात आलं आहे. या हवेल्यांच्या आतमध्येही तुम्हाला उत्तम नक्षीकाम पाहायला मिळतं. वास्तूकलेचा उत्तम नमूना म्हणजे या हवेल्या आहेत. येथे तुम्हाला अत्यंत सुंदर अशा शिल्पकला पाहायला मिळतात.
4. तळघरांसाठी प्रसिद्ध आहेत या हवेल्या
बीकानेरच्या हवेल्यांमध्ये तुम्हाला तळघरही पाहायला मिळतील. या तळघरांचा वापर राजा महाराजे काही खास गोष्टी ठेवण्यासाठी करत असत. ज्या व्यक्तींना या तळघरांबाबत काहीच माहीत नसेल. त्यांचं येथे पोहोचणं अत्यंत कठिण होतं. ही तळघर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.