ठळक मुद्दे* ‘स्कायस्कॅनर’ या ट्रॅव्हल पोर्टलनं काही विमान कंपन्यांचा डाटा एकत्रित करु न इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास यासंदर्भातली काही निरीक्षणं नोंदवली आहेत.* पुढच्या प्रवासाचं नियोजन करताना विमानात हमखास चांगली सीट मिळवण्यासाठी या निरीक्षणांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.* जर लांब पल्ल्याचा प्रवास आरामात करायचा असेल तर चांगली सीट मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच तिकिट बुक करण्याआधी थोडासा होमवर्कआणि योग्य वेळेत तुमचं बुकिंग हे खूप महत्त्वाचं असतं.
- अमृता कदमविमानात बिझनेस क्लासनं प्रवास करायला कुणाला नाही आवडणार? पण समजा काही कारणानं बिझनेस क्लासनं प्रवास करणं जमत नसेल तरी हरकत नाही. इकॉनॉमी क्लासच्या तिकीटातसुद्धा तुम्ही आरामदायी प्रवासाची संधी मिळवू शकता. अर्थात, तुम्हाला काही खास युक्त्या माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला फार मेहनतही करावी लागणार नाही. प्रवासात तुमची प्राथमिकता काय आहे हे मात्र तुम्हाला पक्कं ठाऊक हवं. ‘स्कायस्कॅनर’ या ट्रॅव्हल पोर्टलनं काही विमान कंपन्यांचा डाटा एकत्रित करु न यासंदर्भातली निरीक्षणं नोंदवली आहेत. पुढच्या प्रवासाचं नियोजन करताना विमानात हमखास चांगली सीट मिळवण्यासाठी या निरीक्षणांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.जर लांब पल्ल्याचा प्रवास आरामात करायचा असेल तर चांगली सीट मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच तिकिट बुक करण्याआधी थोडासा होमवर्क आणि योग्य वेळेत तुमचं बुकिंग हे खूप महत्त्वाचं असतं.
तुमची प्राथमिकता ठरवाविमान प्रवास करताना तुम्हाला नक्की कशी सीट हवी हे आधीच ठरवा. म्हणजे पायाजवळ जास्तीची जागा असलेली सीट हवी, कमी गोंगाट असलेली सीट हवी की सर्वांत सुरक्षित सीट तुम्हाला हवी? ही प्राथमिकता एकदा ठरली की त्यानुसार तुम्हाला पसंतीक्र म ठरवणं सोपं जाईल. म्हणजे जर तुम्हाला पाय व्यवस्थित पसरु न प्रवास करणं जास्त आवडत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला थोडासा गोंगाट सहन करायची तयारी ठेवावी लागेल. कारण अनेकदा जास्त लेग स्पेसच्या जागा या छोट्या मुलांना घेऊन प्रवास करणार्या प्रवाशांना दिल्या जातात. जेणेकरून त्यांना फोल्डिंगचे पाळणे ठेवून बसता येईल. विमान प्रवासात जर शांतता ही तुमची प्राथमिकता असेल तर शक्यतो शेवटच्या सीट्स टाळाव्यात. तिथे हवाईसुंदर्या खाण्यापिण्याचं सामान तयार करत असतात. टॉयलेटच्या आसपासची सीटही टाळावी कारण सतत दरवाजा वाजल्यानं तुम्हाला हवी असलेली शांतता मिळणार नाही.
चांगल्या रिसर्चचा फायदास्कायस्कॅनरनं साधारण चार वर्षांपूर्वी एक सर्व्हेे केला होता. त्यातून एक गंमतीशीर बाब पुढे आली. या सव्हेनुसार6 A ही सर्वांत पसंतीची सीट होती तर सर्वात कमी पसंती 31E या सीटला मिळाली. त्यामुळे तुमच्या पसंतीची सीट निवडताना स्वत: काही बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला seatexpert.com सारख्या वेबसाइटची नक्की मदत होऊ शकते. म्हणजे जी सीट तुम्ही निवडत आहात तिथे लेग स्पेस कसा आहे? त्या सीटला टेकून मागे रेलता येतं का? सीटपासून टॉयलेट किती दूर आहे? या सगळ्याची माहिती तुम्हाला आधीच मिळू शकते. शिवाय ज्या सीटवर तुम्ही बसणार आहात तिथे मनोरंजनाची काय सुविधा मिळू शकेल हे देखील तुम्हाला विमानात पाऊल ठेवायच्या आधीच कळेल. अर्थात त्यासाठी गरज आहे थोड्या वेळाची आणि संशोधनाची.लवकर चेक-इनचा फायदाज्या संख्येनं लोक रोज विमान प्रवास करत असतात ते पाहता चांगली सीट मिळवण्यासाठी स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही चेक-इन कराल तितकी चांगली सीट मिळण्याची शक्यता जास्त. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये तर चेक-इन तुम्ही खूप आधी करु शकता. एखादी सीट काऊंटरवर तुम्हाला उपलब्ध नसेल तर आॅनलाइनही तपासून पाहा. काही विमान कंपन्या अगदी उशीरा म्हणजे फ्लाइटच्या अगदी एक आठवडा आधीही सीट रिलीज करतात. यातल्या काही ग्रूप बुकिंगसाठी किंवा नेहमीच्या प्रवाशांसाठीही राखीव ठेवल्या जातात.
एक स्मितहास्यही भरपूर देऊन जातंतुमच्या हसर्या चेहर्यानंही तुम्हाला चांगली सीट मिळू शकते. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. चेक-इन करताना चांगल्या सीटबद्दल चौकशी करा. नेहमीच्या प्रवाशांसाठी सीट अपग्रेड झाल्या की इकॉनॉमी आणि प्रीमियम इकॉनॉमीमधल्या चांगल्या सीट अगदी शेवटच्या मीनिटापर्यंतही रिकाम्या असू शकतात. त्यामुळे एका स्मितहास्यानंही अशी चांगली सीट तुम्हाला मिळू शकते.