शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

पर्यटनासाठी अनुकूल देशांच्या यादीत भारत ५४व्या क्रमांकावर, मागच्या वर्षीच्या तुलनेत स्थान घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 3:25 PM

प्रवास आणि पर्यटनासाठी सर्वात अनुकूल देशांच्या बाबतीत भारत ५४ व्या क्रमांकावर घसरला आहे. यापूर्वी भारत २०१९ मध्ये ४६ व्या क्रमांकावर होता.

प्रवास आणि पर्यटनासाठी सर्वात अनुकूल देशांच्या बाबतीत भारत ५४ व्या क्रमांकावर घसरला आहे. यापूर्वी भारत २०१९ मध्ये ४६ व्या क्रमांकावर होता. अमेरिका, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, सिंगापूर आणि इटली या यादीत पहिल्या दहामध्ये आहेत. प्रवास आणि पर्यटनावरील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या द्विवार्षिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की महामारीनंतर या प्रदेशातील परिस्थिती सुधारत आहे. तथापि, हे देखील खरे आहे की सुधारणा असमान आहे आणि आव्हाने कायम आहेत. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक जगातील ११७ अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन करतो. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात शाश्वत आणि लवचिक वाढ सक्षम करणाऱ्या अर्थव्यवस्थांवर मुख्य भर आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एव्हिएशन, ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या अध्यक्षा लॉरेन अपिंक यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या दरम्यान झालेल्या लॉकडाऊनमुळे जगातील अनेक अर्थव्यवस्थांवर तसेच प्रवास आणि पर्यटनाच्या महत्त्वावर परिणाम झाले आहेत. अपिंग यांनी असेही म्हटले आहे की जग महामारीतून सावरत असताना, जगभरातील देश लवचिकता दाखवतील आणि येत्या दशकांमध्ये प्रवास, पर्यटन क्षेत्र मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करतील.

तथापि, आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसाय अजूनही कोरोनाच्या काळापूर्वीच्या तुलनेत चांगला नाही. लसीकरणाच्या जलद गतीने या भागात सुधारणा झाली आहे. आता लोक पुन्हा प्रवास करू लागले आहेत. देशांतर्गत आणि निसर्गावर आधारित पर्यटनालाही गती मिळाली आहे. मागणीतील हा बदल अनेक व्यावसायिक आणि पर्यटन स्थळांनी मान्य केला आहे. अमेरिका व्यतिरिक्त, युरोप आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रातील शीर्ष १० देशांमध्ये जानेवारी २०२१ च्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स