शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

Yuvraj Singh: क्या बात है! युवराज सिंगच्या गोव्यातील आलिशान बंगल्यात करता येणार मुक्काम;  पाहा कधी आणि कसं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 3:19 PM

२८ सप्टेंबरपासून करता येणार बुकिंग

Yuvraj Singh Goa Home: भारतीय माजी क्रिकेटर युवराज सिंगने गेली दोन दशके चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. २००७चा टी२० वर्ल्ड कप असो की २०११ चा वन-डे वर्ल्ड कप असो, युवराजचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर युवराज आपली पत्नी-मुलांसह वरळीच्या आलिशान अशा घरात राहतो. त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे त्याच्या गोव्यात असलेल्या आलिशान अशा बंगल्यात आता तुम्हालाही मुक्काम करता येणार आहे. युवराज सिंगने Airbnbचे यजमान बनत, गोव्यातील त्याचा बंगला सहा जणांच्या ग्रुपसाठी मुक्कामाला देण्याचा निर्णय घेतलाय. समुद्राजवळ एका टेकडीवर वसलेला असा हा बंगला आहे. सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, अद्वितीय पाककृती आणि आदरातिथ्य यासाठी प्रसिद्ध असलेले गोवा राज्य भारत आणि जगभरातील पर्यटकांकडून सातत्याने व सर्वाधिक मागणी असलेले व आवडीचे ठिकाण आहे. येथेच युवराजच्या तीन बेडरूमच्या या हॉलिडे होममध्ये एका वेळी सहा पाहुण्यांसाठी मुक्कामाची सोय केली जाणार आहे. बंगल्यात युवराजने खेळपट्टीवर गाजवलेले क्षण आणि त्यांच्या अनेक अर्थपूर्ण आठवणी अनुभवायला मिळतील.

युवराजचे हे स्वीट होम airbnb.com/yuvrajsingh वरून बुक करता येईल. त्याचा वाढदिवस आणि जर्सी क्रमांक - १४ ते १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दोन रात्रींच्या मुक्कामासाठी हे घर उपलब्ध असेल. “माझे गोव्यातील घर माझ्यासाठी नेहमीच खास आहे. माझे काम मला जगभर घेऊन जात असताना, या व्हिला मध्ये माझी पत्नी आणि मी आमच्या मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी एकत्र येतो.  मी एअरबीएनबी होस्ट बनून  भाग्यवान  सहा जणांच्या  गटासाठी माझ्या घरात स्वागत करण्यास उत्सुक आहे,” असे युवराजने पोस्ट शेअर करत सांगितले.

व्हिलाबद्दल थोडेसे-

- डोंगरमाथ्यावरील उंच ठिकाणावरून, १८० पॅनोरमा अँगलमध्ये ह्या व्हिलावरून समुद्र निसर्गाचे दर्शन घडते. विहंगम दृश्यांसह, 'कासा सिंग' वरून सूर्योदयावेळी रंगीबेरंगी व आकर्षित दिसणारे गावांवर पडलेले सोनेरी ऊन मन शांत करते. विस्तीर्ण डेक आणि टेरेस हे कुंडीतली फुलझाडे आणि हिरवळीने पसरलेले आहे, यात बोगनविल आणि इतर रंगबीरंगी फुले आहेत. आलिशान पूलमध्ये स्विम अप बार आणि  दुपारसाठी वाचन किंवा आरामात जेवणाचा आनंद घेण्यासाठी अनेक जागा आहेत.

- मुख्य मेझानाइन जागेच्या अगदी जवळ असलेल्या जेवणाच्या खोलीत स्थानिक गोव्याचे पदार्थ घरच्या वैयक्तिक आचारीद्वारे बनवून दिले जातील.  हे घर  सिंग यांच्या कुटुंबाच्या फोटोंनी भरले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पहिल्या ओडीआय १५० सह - अनेक क्रिकेट पुरस्कारांनी सजविलेले आहे.

“आम्ही युवराज सिंगसोबत एअरबीएनबीचे होस्ट म्हणून 'वन टाईम स्टे' भागीदारी करताना खूप खुश आहोत. आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा जोरात सुरू असताना, हा अविस्मरणीय अनुभव जागतिक प्रेक्षकांना देताना आणि सिंग यांना भारतातील आमच्या यजमान समुदायात जोडताना आम्हाला आनंद होत आहे,” असे एअरबीएनबीचे भारत, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले.

मुक्कामाच्या घटकांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट-

- पाहुण्यांना 'कासा सिंग'मध्ये विशेष प्रवेश  -  आगमनानंतर युवराज सिंगकडून व्हर्च्युअल पद्दतीने अभिवादन-  युवराजच्या गोव्यातील आवडत्या हँगआउट स्पॉट्स शेअर करणारी स्वागत टिप-  नयनरम्य दिवार बेटावर ई-बाईकवर सहल, खारफुटीचे शेत, चर्च, मंदिरे आणि सुंदर घरे यातून फिरण्याचा अनुभव - युवराजच्या आयकॉनिक इनिंगचे स्क्रीनिंग- मुक्कामाला असेपर्यंत युवराजचे आवडते स्थानिक पदार्थ यांचा आस्वाद- युवराजकडून वैयक्तिकृत (Customised) स्मरणिका

बुकिंग कसे कराल?

बुकिंग २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता airbnb.com/yuvrajsingh वर सुरू होईल. गोव्यात येण्याची आणि तेथून परत प्रवासाची जबाबदारी पाहुण्यांनी स्वतः घ्यावी.  बुकिंग करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी हे लक्षात घ्यावे, की या मुक्कामादरम्यान स्थानिक कोविड -१९  मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. पाहुण्यांनी लागू स्थानिक आणि राज्य मार्गदर्शक तत्त्वे तसेच  एअरबीएनबीच्या कोविड -१९  सुरक्षा पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात स्थानिक नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे समाविष्ट आहे. अतिथी  गोव्यातील आणि तेथून परतीच्या प्रवासासाठी स्वतः जबाबदार असतील. तसेच त्यांचे एअरबीएनबीकडे नोंदणीकृत खाते असणे आवश्यक आहे. इतर अटी आणि नियम कृपया airbnb.com/yuvrajsingh वर पाहू शकता.

टॅग्स :Yuvraj Singhयुवराज सिंगgoaगोवाHomeसुंदर गृहनियोजनtourismपर्यटन