आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरण्याची आवड असते. काही लोकांना शांत ठिकाणी तर काही लोकांना अॅडवेंचर्स करता येण्याजोग्या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असते. अॅडवेंचर्ससाठी अनेक लोक विदेशातील ठिकाणांचा पर्याय निवडतात. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या भारतातही अॅडवेंचर्स स्पोर्ट्ससाठी अनेक ठिकाण आहेत. जाणून घेऊया भारतातील अशा काही जागांबाबत ज्या स्काय डायविंगसाठी प्रसिद्ध आहेत. येथे जाऊन तुम्ही स्कायडायविंगचा थरार अनुभवू शकता.
म्हैसूर, कर्नाटक
म्हैसूरमधील चामुंडी हिल्स स्काय डायविंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे 3 तासांच्या स्काय डायविंगसाठी जवळपास 35,000 रुपये खर्च येतो. आधी ट्रेनिंग दिल्यानंतरच 4000 फूट उंचावर स्काय डायविंग करण्यासाठी पाठवण्यात येते.
दीसा, गुजरात
आभाळात उडता उडता चारही बाजूंना पसरलेला निळा समुद्र आणि निळ्या सरोवरांचं मनमोहक दृश्य पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्काय डायविंगसाठी गुजरातच्या दीसा शहरामध्ये जाऊ शकता. येथे स्टेटिक लाइन जंप्ससाठी जवळपास 16,500 रुपये खर्च करावे लागतात. तेच टेंडेम जंपसाठी 33,500 रुपये खर्च येतो.
पुद्दुचेरी, तमिळनाडू
तमिळनाडूच्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर म्हणजे पद्दुचेरी. स्काय डायविंगचा सुंदर एक्सपीरियंस करू शकता. येथे एका स्टेटिक जंप्ससाठी जवळपास 18,000 रुपये खर्च केले जातात. आणि 5 स्टेटिक जंप्ससाठी 62,000 रुपये खर्च केले जातात. अशाप्रकारे टेंडेम जंपसाठी 27,000 रुपये खर्च करण्यात येतात.
अॅम्बी वॅली, महाराष्ट्र
जर तुम्ही मुंबई आणि पुण्याजवळ राहत असाल तर फिरायला जाण्यासाठी अॅम्बी वॅली एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही येथे स्काय डायविंगचा आनंद घेऊ शकता. येथे टेंडेम जंपसाठी सोमवार ते गुरुवारपर्यंतचा खर्च 20,000 रुपये येतो. तेच शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये टेंडेम जंपसाठी 25,000 रुपये आकारण्यात येतात. येथे तुम्ही सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत स्काय डायविंगचा आनंद घेऊ शकता.
धना, मध्यप्रदेश
मध्यप्रदेशमधील धना टूरिस्ट स्पोर्ट्सव्यतिरिक्त स्काय डायविंगसाठी फेमस आहे. येथे टेंडेम जंपसाठी वीकडेज म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत 35,000 रुपये खर्च येतो. तेच हीकेंड म्हणजेच शुक्रवारपासून रविवारपर्यंत टेंडेम जंपसाठी 37,500 रुपये खर्च येतो. स्टेटिक जंपसाठी 24,000 रुपये खर्च येतो.