(Image Credit : Pixabay)
भारतात खळखळून वाहणाऱ्या नद्यांची, समुद्र किनाऱ्यांची आणि तलावांची कमतरता अजिबात नाहीये. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजणांना उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी वेगवेगळे वॉटर गेम्स खेळण्याची इच्छा असते. उन्हाळ्यात नुसतं हिल्स स्टेशनला फिरायला जाण्याऐवजी तुम्हाला वेगवेगळे रोमांचक वॉटर गेम्स खेळायला मिळतील अशा ठिकाणांवर जाणे चांगला पर्याय ठरु शकतो. त्यामुळे आम्ही अशाच पाच ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही वॉटर गेम्स एन्जॉय करु शकता.
बंगळुरु - भीमेश्वरीमध्ये वॉटर राफ्टिंग
(Image Credit : Holidify)
कर्नाटकमध्ये बंगळुरुजवळ भीमेश्वरीमध्ये कावेरी नदीच्या तटावर वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर गेम्सचा आनंद घेता येऊ शकतो. सोबतच इथे तुम्ही वॉटर राफ्टिंगचाही आनंद घेऊ शकता. तसेच कयाकिंग आणि कोरकल राइड्सही तुम्हाला रोमांचक अनुभव देतात. धावपळीच्या जीवनापासून दूर स्ट्रेस दूर करण्यासाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इथे तुम्ही मासे पकडण्याचाही आनंद घेऊ शकता.
कोलकाता - हुगली नदीवर क्रूजचा आनंद
(Image Credit : indiaunbound.com.au)
कोलकातामध्ये हुगली नदीवर क्रूजचा अनुभव तुमच्या लाइफमध्ये एक नवी एनर्जी आणेल. या क्रूजच्या सवारी दरम्यान तुम्ही शहरातील वेगवान जीवनापासून दूर जाल आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. हुगली नदीमध्ये तुम्ही ग्लायडिंगही करु शकता. मायापूरच्या ग्रामीण भागात फिरु शकता.
अरुणाचल प्रदेश - ब्रम्हपुरी नदीमध्ये राफ्टिंग
(Image Credit : River Rafting in Rishikesh)
अरुणाचल प्रदेशात तुम्ही ब्रम्हपुत्रा नदीत राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. या नदीच्या खळखळून वाहणाऱ्या पाण्यात तुम्हाला नक्कीच एक रोमांचक अनुभव मिळेल. इथे राफ्टिंग दरम्यान तुम्ही डोंगराळ भागाची आणि आदिवासी पाड्यांची सैरही करु शकता.
केरळ - बॅकवॉटर कयाकिंग
(Image Credit : TripAdvisor)
तुम्ही हाऊसबोटमधून केरळच्या बॅकवॉटरचा आनंद घेऊ शकता. केरळचं नैसर्गिक सौंदर्य जवळून बघण्याचा हा एक बेस्ट पर्याय आहे. इथे तुम्ही तुमचा प्रवास एलेप्पी येथून सुरु करुन गावांना भेटी देत चप्पू, पुलीकुन्नू, कवलम द्वीप आणि कोविलकोमपर्यंत पोहोचू शकता. तसेच तुम्ही इथे हेरिटेज व्हिलामध्ये राहून बॅकवॉटर्सचा आनंद घेऊ शकता.
अंदमान - स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि अंडरवॉटर पार्क
(Image Credit : TravelTriangl)
अंदमान द्वीप समूहाच्या निसर्ग सौंदर्यासोबतच तुम्ही पाण्यात चांगला वेळ घालवू शकता. हॅवलॉक द्वीप इथे स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वात चांगला मानला जातो. जर तुम्हाला स्कूबा डायव्हिंगची आवड नसेल तर तुम्ही इथे तुम्ही वेगवेगळे समुद्री जीव बघण्याचा आनंद घेऊ शकता. व्हेकेशन दरम्यान इथे घेतलेल्या वॉटर गेम्सचा अनुभव आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील असाच असेल.