IRCTC Tour Package : जर तुम्ही वीकेंडमध्ये जवळच्या एखाद्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अमृतसरच्या दिशेने जाऊ शकता. यासाठी आयआरसीटीसीने शानदार पॅकेज आणले आहे. या पॅकेजनुसार, 13 मार्चपासून हा प्रवास सुरू होत आहे. भारतीय रेल्वेच्या या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...
हे पॅकेज ४ रात्री-५ दिवसांसाठी आहे. तुम्ही दोन दिवसांच्या सुट्टीवर आणि आठवड्याच्या दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याचा आणि तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आनंद लुटण्याचा प्लॅन करू शकता. हा प्रवास मुंबईहून 13 मार्चला 18:45 वाजता सुरू होईल.
पॅकेजची किंमत?मुंबई-अमृतसर प्रवासाच्या पॅकेजच्या भाड्याबद्दल बोलायचे झाले तर ते 15500 रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही एकट्याने जात असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 22000 रुपये खर्च करावे लागतील. जर 2 लोक जात असतील तर प्रति व्यक्ती 16000 रुपये मोजावे लागतील. तर तीन लोकांसाठी 15500 रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील. जर तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षांची मुलं असतील तर तुम्हाला बेडशिवाय 12900 रुपये आणि बेडसोबत 13300 रुपये द्यावे लागतील.
काय असेल पॅकेजमध्ये?या पॅकेजमध्ये हॉटेल एसी बसमधील प्रवासासह दिवसाला 2 टाईमचे जेवण समाविष्ट आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही मुंबईहून 18:50 वाजता निघून 23:40 वाजता अमृतसरला पोहोचाल आणि नंतर रात्री येथील हॉटेलमध्ये आराम कराल. दुसऱ्या दिवशी नाश्ता केल्यानंतर, तुम्हाला सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर येथे नेले जाईल. रात्रीचे जेवण आणि रात्रीचा मुक्काम अमृतसरमध्ये असेल. तिसऱ्या दिवशी, नाश्ता केल्यानंतर, तुम्हाला हॉटेलमधून गोबिंदगड किल्ल्याला भेट देण्यासाठी नेले जाईल. तुम्हाला 18:30 वाजता ट्रेन पकडण्यासाठी अमृतसर रेल्वे स्टेशनवर नेले जाईल. पाचव्या दिवशी तुम्ही 23:35 वाजता मुंबईला पोहोचाल.