नवी दिल्ली : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी आता 2 वर्षांनंतर जवळजवळ पूर्णपणे हटवण्यात आली आहे. हे निर्बंध हटवल्यानंतर लोकांची पुन्हा भटकंती सुरू झाली आहे. लोक आपल्या देशात प्रवास करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय ट्रिपचेही नियोजन करू लागले आहेत.
कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थितीही मंदावली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुम्ही दुसर्या देशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि ही ट्रिप तुमच्यासाठी कमी बजेटची असावी, असे तुम्हाला वाटत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली ऑफर आणली आहे. आयआरसीटीसी तुम्हाला तुमच्या आंतरराष्ट्रीय टूरसाठी परवडणारी जागा शोधण्यात मदत करू शकते. जर तुम्हाला या पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याची सर्व माहिती सहज मिळेल.
काय आहे ऑफर?आयआरसीटीसीने थायलंडमध्ये फिरण्यासाठी फक्त 49,067 रुपयांमध्ये एअर टूर पॅकेज (Air Tour Package) आणले आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही थायलंडमधील सर्व ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. एका व्यक्तीसाठी या पॅकेजची सुरुवातीची किंमत 49,067 रुपये ठेवण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये विमान तिकीटाशिवाय इतर सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.
काय मिळेल सुविधा?या पॅकेजला थायलंड डिलाइट्स एक्स गुवाहाटी (Thailand Delights Ex Guwahati) असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला गुवाहाटी आंतरराष्ट्रीय ट्रिप केली जाईल. यामध्ये तुम्हाला ये-जा करण्यासाठी विमानाचे तिकीट दिले जाईल, निवास व्यवस्था, सकाळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. दुपारच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागेल. यामध्ये तुम्हाला बुद्ध मंदिर, सफारी वर्ल्ड इत्यादी विविध ठिकाणी नेले जाईल.
किती दिवस असेल ट्रिप?हे आयआरसीटीसीचे पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रींसाठी आहे. ही ट्रिप 13 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल आणि 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत संपेल. या पॅकेजमध्ये बँकॉक आणि पटायासारख्या डेस्टिनेशनचा समावेश आहे.