आंध्रप्रदेशमध्ये असलेल्या प्रसिद्ध तिरूपति बालाजी मंदिराचं दर्शन घेण्याची इच्छा तर सर्वानाच असते. तुम्हीही अनेक दिवसांपासून येथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे. आयआरसीटीसी त्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन आलं आहे. यामध्ये फ्लाइटपासून राहण्याचा आणि जेवणाचा खर्च समाविष्ठ असणार आहे. यामुळे तुम्ही टेन्शनशिवाय आणि अगदी कमी पैशांमध्ये बालाजीचे दर्शन करू शकणार आहात.
आयआरसीटीसीच्या या पॅकेजला Blissful Tirupati Special Ex Mumbai असं नाव देण्यात आलं आहे. याअंतर्गत या यात्रेची सुरुवात 2 फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे. पॅकेजअंतर्गत फेब्रुवारी 23 रोजी या यात्रेचा शेवट करण्यात येणार आहे. तेच मार्चमध्ये 2, 9, 16, 23 आणि 30 तारखेलाही या टूरचे आयोजन करण्यात येणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही तारखेची निवड करू शकता. हे पॅकेज 2 दिवस आणि एका रात्रीचं असणार आहे. तेच एकावेळ 24 लोकांच्या ग्रुपला ही यात्रा करता येणार आहे.
काय आहे पॅकेजमध्ये?
टूर पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते मुंबई येण्या-जाण्यासाठी फ्लाइट टिकिट्स, एका वेळेचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, 12 सीटर बसमधून साइटसीइंग, पाण्याची बाटली आणि रात्री राहण्यासाठी डिलक्स होटेलची व्यवस्था करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या इतर सुविधांसाठी प्रवाशांना स्वतःचा खर्च स्वतः करावा लागणार आहे. एअर टिकिटच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यास, एअरपोर्ट टॅक्स, फ्यूल सरचार्ज, गाइड्स, ड्राइव्हर टिप्स इत्यादी सुविधांचा या पॅकेजमध्ये समावेश असणार आहे.
पॅकेजची किंमत
आईआरसीटीसीच्या या पॅकेजची किंमत वेगवेगळी आहे. जर तुम्ही एकटे जाणार असाल तर तुम्हाला 15,350 रुपये मोजावे लागणार आहेत. तेच दोन लोकांसाठी प्रत्येकी 13,100 रुपये आणि तीन लोकांसाठी 12,950 रुपये द्यावे लागतील. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी तुम्हाला 12,700 रुपये भरावे लागतील.