जर तुम्हीही वीकेंडला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. वीकेंडसाठी तुम्ही तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरला जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बजेटची चिंता करण्याचीही गरज नाही. कारण उदपूर फिरण्यासाठी भारतीय रेल्वेने कॅटरिंग अॅन्ड टूरिज्म कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) एक खास पॅकेज घेऊन आलं आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही फक्त चारच दिवसांमध्ये उदयपूर फिरून परत येणार आहात. यासाठी रेल्वेने पॅकेजची किंमत वेगवेगळ्या क्लासची वेगवेगळी ठेवली आहे.
उदपूरबाबत सांगायचे झाले तर, या शहरामध्ये आल्यानंतर तुम्ही तलावांव्यतिरिक्त राजस्थानी संस्कृतीचा जवळून अनुभव घेऊ शकता. येथे फिरण्यासाठी फतेहसागर तलावासोबत पिछोला तलाव, सिटी फॅलेस, जगदीश मंदिर, जगमंदिर यांसारख्या अनेक जागा आहेत. उदयपूरसाठी आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचं नाव लेक सिटी टूर (LAKE CITY TOUR) असं ठेवण्यात आलं आहे. रेल्वे प्रत्येक गुरुवारी ही टूर अरेंज करतं. जाणून घेऊया या टूर पॅकेजच्या आणखी काही डिटेल्स...
पॅकेजची किंमत :
3 एसी साठी
जर तुम्ही एकटेच या टूरवर जाणार असाल तर तुम्हाला 14,600 रूपये, दोन लोकांसाठी 9,200रूपये प्रति व्यक्ति आणि जर तीन व्यक्ती असतील तर 7,650 रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील. जर तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षींची मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला 7,650 रुपये मोजावे लागतील. यामध्ये रेल्वे तुमच्या मुलांसाठी बेडची व्यवस्थाही करणार आहे.
स्लीपर क्लाससाठी
स्लीपर क्लासने जर प्रवास करणार असाल तर, एका व्यक्तीसाठी 12,300 रुपये, दोघांसाठी 6,900रुपये प्रति व्यक्ती, तीन लोकांसाठी किंवा 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी 5,350 रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील. तलावांच्या शहारामध्ये सफर करण्यासाठी दिल्लीपासून सराय रोहिल्ला रल्वे स्टेशन (DEE) पासून ट्रेन सुरू होणार असून ती उदयपूरपर्यंत असेल.
ट्रेनचं शेड्यूल
प्रत्येक गुरूवारी ट्रेन 12981 चेतक एक्सप्रेस रात्री 7 : 40 वाजता दिल्लीसाठी सराय रोहिल्ला रेल्वे स्टेशनवरून रवाना होते. गुरुग्राम, रेवाडी, नारनॉल वरून जात असताना पुडच्या दिवशी सकाळी 7:50 वाजता उदयपूर रेल्वे स्टेशनपर्यंत जाते. रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला हॉटेलपर्यंत घेऊन जाण्यात येईल. त्यानंतर काही वेळा आराम केल्याने तुम्हाला एसी बसमध्ये सहेलियो की बाडी, सुखाडिया सर्किल, सिटी पॅलेस म्यूझिक यांसारख्या प्रसिद्ध जागांवर फिरण्यासाठी नेण्यात येईल.
तुम्हाला फतेहसागर तलावामध्ये बोटिंगचा आनंदही घेऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. कारण पॅकेजमध्ये बोटिंगचे पैसे समाविष्ट नाहीत. पूर्ण दिवस उदयपूरमध्ये फिरून तुम्ही हॉटेलमध्ये परत येऊ शकता. पुडच्या दिवशी (शनिवार) चेतक एक्सप्रेस संध्याकाळी 5.15 वाजता उदयपूरपासून निघते. तुम्ही गरज असल्यास शॉपिंगही करू शकता.
पॅकेजमध्ये समावेश होणाऱ्या सुविधा
आयआरसीटीसीच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला रेल्वे तिकीट, हॉटेलचं भाडं, एक ब्रेकफास्ट, एसी बसमध्ये फिरणं या गोष्टींचा समावेश असेल. या पॅकेजमध्ये खाणं समाविष्ट नसेल. तुम्ही प्रवासादरम्यान काहीही खात असाल तर त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागतील.