आता अत्यंत कमी दरात करा केरळची सफर; IRCTC देत आहे सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:54 PM2019-01-08T17:54:07+5:302019-01-08T17:56:31+5:30
'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखलं जाणारं केरळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी जणू स्वर्गच आहे. अनेकदा पर्यटकांमध्ये केरळचं आकर्षण असतं.
'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखलं जाणारं केरळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी जणू स्वर्गच आहे. अनेकदा पर्यटकांमध्ये केरळचं आकर्षण असतं. येथे असणार सुंदर हिल स्टेशन्स, उंच इंच ताडाची झाडं, चहाचे मळे आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले बॅकवॉटर्स, वेस्टर्न घाट, हाउसबोट यांसारख्या गोष्टींचे पर्यटकांमध्ये नेहमीच आकर्षण असते. एकदा तरी या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी केरळला भेट द्या.
जर तुम्ही अजुनपर्यंत केरळला भेट दिली नसेल तर IRCTC एक सुवर्णसंधी तुम्हाला देत आहे. IRCTC टूरिज्म तुमच्यासाठी खास मॅजेस्टिक केरळ विथ हाउसबोट टूर पॅकेज घेऊन आलं आहे. 6 दिवस आणि 5 रात्रींच्या या टूर पॅकेजची सुरुवात हैद्राबादपासून होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला केरळच्या प्रसिद्ध 4 डेस्टिनेशन्स कोचिन, मुन्नार, थेक्केडी आणि कुमाराकॉम फिरण्याची संधी मिळणार आहे.
IRCTC, will take you to the beautiful state of Kerala also known as God’s Own Country' on India's tropical Malabar Coast, has nearly 600 km of Arabian Sea shoreline is known for its palm-lined beaches, backwaters and a network of canals. pic.twitter.com/JFs2LFLO0k
— IRCTC (@IRCTCofficial) January 5, 2019
सर्वात खास गोष्ट म्हणजे, या पॅकेजमध्ये फ्लाइटचा खर्च, 3 स्टार हॉटल्समध्ये राहणं, 1 रात्र डिलक्स हाउसबोटमध्ये राहणं, 5 दिवस नाश्ता आणि डिनरसोबत एक दिवसांचं लंच आणि केरळमधील या प्रसिद्ध शहरांमध्ये फिरण्याचा खर्चही समाविष्ट असेल.
या टूरची सुरुवात 21 फेब्रुवारी 2019पासून होणार असून हैद्राबादपासून कोचिनपर्यंत इंडिगो फ्लाइटने जाणं आणि येणं देखील समाविष्ट असेल. पॅकेजच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर ट्रिपल ऑक्यूपेंसी म्हणजेच 3 लोकांसोबत एकत्र येऊन टूर बुक करत असाल तर या पॅकेजची किंमत 23 हजार 573 रूपये प्रति व्यक्ती असेल. डबल ऑक्युपेंसीवर 25 हजार 418 रूपये आणि जर तुम्ही एकटं फिरण्याचा प्लॅन करत असाल तर 36 हजार 571 रूपये प्रति व्यक्ती खर्च येईल.