तमिळनाडू आपल्या निसर्गसौंदर्यामुळे अनेक पर्यटकांची पहिली पसंती असते. तमिळनाडूमधील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरं अत्यंत प्रसिद्ध आहेत. जर तुम्हीही तमिळनाडूमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर, आयआरसीटीसीचं हे खास पॅकेज फक्त तुमच्यासाठीच आहे. दरम्यान आयआरसीटीसीने तमिळनाडूमधील मंदीरांचं दर्शन घडविण्यासाठी एक स्पेशल पॅकेज अनाऊस केलं आहे आणि त्याला 'रामसेतु एक्सप्रेस-तमिलनाडु टेंपल टूर'चं नाव देण्यात आलं आहे.
खास गोष्ट म्हणजे, हे टूर पॅकेज अत्यंत माफक दरात मिळणार असून फक्त 4,885 रुपयांमध्ये तुम्हाला तमिळनाडूच्या मंदिरांची सफर करता येणार आहे. या पॅकेजअंतर्गत जी ठिकाणं कव्हर करण्यात येणार आहेत ती पुढिलप्रमाणे : श्रीरंगम, त्रिची, रामेश्वरम, मदुरै, तंजोर आणि कुंभकोनम. रामसेतु एक्सप्रेससाठी काही बोर्डिंग स्टेशन्स ठरविण्यात आले आहेत. जिथून तुम्हाला ही ट्रेन मिळू शकते. जसं की तंबरम (Tambaram), चेंगलपट्टू (Chengalpattu), Tindivanam, Villupuram आणि Vridhachalam इत्यादी.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून रेल्वेने आपल्या धार्मिक पॅकेजे्सची एक सीरीज सुरू केली आहे. या सीरीज अंतर्गत आतार्यंत अनेक धार्मिक टूर पॅकेज अनाऊस करण्यात आली आहेत. मागील वर्षी रेल्वेने भारत आणि श्रीलंकेमध्ये असणाऱ्या मंदिरांशी निगडीत अशा ठिकाणांना भेट देण्यासाठी रामायण एक्सप्रेस सुरू केली होती. तसेच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी सात दिवसांची टूर आणि बौद्ध मंदिरं असणाऱ्या स्थळांना भेट देण्यासाठी समानता एक्सप्रेस टूरिस्ट ट्रेनची सुरुवात केली होती.