नवी दिल्ली : 2021 हे वर्ष संपणार आहे आणि ख्रिसमसच्या सुट्ट्याही याच महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये येणार आहेत. तुम्ही तुमच्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये एखाद्या रोमांचक ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर अंदमान बेट तुमच्यासाठी सर्वात आकर्षक आणि रोमांचक ठिकाणांपैकी एक आहे. अंदमान हे पर्यटकांसाठी नेहमीच आवडते ठिकाण राहिले आहे. दरम्यान, जे लोक अंदमानला भेट देण्याचा प्लॅन आखत आहेत, त्यांच्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) एक शानदार हवाई टूर पॅकेज देखील देत आहे. याबद्दल जाणून घेऊया...
अंदमान टूरची सुरुवात मुंबई विमानतळावरून होणार आहे. मुंबई विमानतळावरून प्रवासी पोर्ट ब्लेअरला रवाना होतील. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर पर्यटक थोडा वेळ विश्रांती घेतील. संध्याकाळी, पर्यटक सेल्युलर जेल, लाइट अँड साउंड शो आणि कॉर्बिन्स कोव्ह बीचचा आनंद घेतील. यानंतर दुसऱ्या दिवशी नाश्ता केल्यानंतर पर्यटक नील बेटावर प्रीमियम क्रूझवर जातील. नील बेटावरील हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर, पर्यटक नॅचरल ब्रिज आणि लक्ष्मणपूर बीचवर फिरण्याचा आनंद घेतील. याशिवाय, भरतपूर बीचवर पर्यटकांना सूर्यास्ताचा आनंद लुटता येणार आहे. यानंतर पुढील दिवशी नाश्ता करून पर्यटक क्रूझने एलिफंट बीचकडे रवाना होतील. एलिफंट बीचवर पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतात.
संध्याकाळी, पर्यटक राधानगर बीचला भेट देतील आणि हॅवलॉक बेटावर रात्रभर मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी कालापठार बीचला भेट दिल्यानंतर पर्यटक क्रूझने पोर्ट ब्लेअरला रवाना होतील. पुढील दिवशी पर्यटक रॉस आयलंड आणि नॉर्थ बेला भेट देतील. यानंतर, प्रवासी दुपारचे जेवण घेतील आणि रात्री हॉटेलमध्ये विश्रांती घेतील. यानंतर पुढील दिवशी नाश्ता केल्यानंतर पर्यटक हॉटेलमधून चेक आउट करतील आणि समुद्रिकाला (नौदल सागरी संग्रहालय) भेट देतील. त्यानंतर विमानतळावरून पर्यटक मुंबईला रवाना होतील. दरम्यान, अंदमानमधील सहा दिवस आणि पाच रात्रीच्या या टूर पॅकेजसाठी तुम्हाला 47700 रुपये खर्च करावे लागतील.