डोंगररांगांमध्ये वसलेला देश भूतान, अत्यंत शांत आणि सुंदर देश आहे. येथील निसर्गसौंदर्य अत्यंत सुंदर आणि मनमोहून टाकणारं आहे. येथील जीवनशैली अत्यंत साधारण असून येथील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहत असतात. तुम्ही हे ऐकून कदाचित हैराण व्हाल की, जगातील सर्वात गरीब देशांमध्ये समावेश होत असूनही भूतान जगातील सर्वात सुखी आणि आनंदी देशांपैकी एक आहे. याचं सर्वात मुख्य कारण येथील जीवनशैली आहे. याच गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आयआरसीटीसी आपल्या पर्यटकांना जून महिन्यामध्ये भूतान फिरण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिज्म कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) ट्विटर हॅन्डलवरून काही दिवसांपूर्वीच भूतानच्या ट्रिपबाबत माहिती शेअर केली आहे. भूतानची ही टूर भारतीय रेल्वेच्या पर्यटन विभागाद्वारे नियोजित करण्यात येत आहे. पाच रात्री आणि सहा दिवसांचा अवधी असणाऱ्या या ट्रिप दरम्यान पर्यटकांना थिम्पू आणि पुखाना यांसारख्या जागा फिरण्याची संधी मिळणार आहे. तुम्हीही भूतान फिरण्यासाठी इच्छुक असाल तर या ट्रिपची सुरुवात दिल्लीपासून होणार आहे. खास गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत इंटरनॅशनल टूरचा आनंद घेण्याची इच्छा असेल तर, या ट्रिपसाठी फक्त 44 हजार 700 रूपये खर्च करावे लागतील.
आयआरसीटीसी टूरिज्मची अधिकृत वेबसाइट irctctourism.com वर या टूरबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
IRCTC भूतान पॅकेजबाबत महत्वाच्या सर्व गोष्टी...
1. या टूर कॅकेजचे किंमत निश्चित नसून प्रवाशांनी निवडलेल्या ऑक्यूपेसीनुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. दोन लोकांसाठी प्रवाशांना 44 हजार 700 रूपये मोजावे लागणार असून तीन लोकांसाठी जर हे टूर पॅकेज बुक करायचं असेल तर प्रति व्यक्तीमागे आकर्षक सूटही मिळणार आहे.
2. या पॅकेजमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये पर्यटकांना पाच रात्रीसाठी हॉटेलचं बुकींग चार्ज, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं खाणं देण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये 80 वर्षापेक्षा कमी वयाच्या प्रवाशांसाठी प्रवासी विम्याची सोय असणार आहे.
3. या टूर पॅकेजबाबतच्या अधिकृत माहितीसाठी किंवा टूर पॅकेज बुक करण्याबाबत स्रव माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.