इटलीतील शहर मातेराला अनेक वर्षांपासून गरीबी आणि मागसलेल्यामुळे राष्ट्रीय अपमानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु आता परिस्थिती बदललेली असून गुहांमध्ये तयार करण्यात आलेले चर्च, महाल आणि विकास कार्यांमुळे मातेरा हे शहर 2019साठी युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे, येथे येणारे पर्यंटक फक्त 22 हजार डॉलर (जवळपास 1538 रुपये) खर्च करून या शहराचे टेम्पररी सिटीजन बनू शकतात आणि दक्षिण रोमचा 400 किलोमीटरपर्यंतचा संपूर्ण परिसर पूर्ण वर्षभर फिरू शकतात.
जुन्या गोष्टी मागे सारून
मातेराचे मेयर राफेलो द रुगिएरी यांनी सांगितले की, मातेराच्या फक्त नावानेच आमची मान शर्मेने खाली झुकत असे. परंतु आता ही गोष्ट जुनी झाली. इथुन पुढे मातेरा नाव ऐकताच आमची मान अभिमानाने उंचावेल. 1950च्या दशकामध्ये इटलीच्या प्रधानमंत्र्यांनी मातेराचा विकास न झाल्यामुळे नाराजी व्यक्ती केली होती. यावेळी मातेरामधील लोकं तेथील गुहांमध्ये वीजेशिवाय वास्तव्य करत असत. त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणीही नव्हते.
मातेरा बॅसिलिकाता क्षेत्रामध्ये वसलेलं आहे. वर्षभरामध्ये मातेरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांसाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. मातेरा-बॅसिलिकाता 2019 फाउंडेशनचे संचालक पाओला वेरी यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, आमची अशी इच्छा आहे जगभरातील पर्यटकांनी येथे येऊन येथील संस्कृतिचा अनुभव घ्यावा.
'येरूशलम ऑफ द वेस्ट'
रुगिएरी यांनी सांगितल्यानुसार, मातेरा जगभरातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. या 'राला येरुशलम ऑफ द वेस्ट' असंही म्हटलं जातं. पुरातत्व अवशेषांनुसार असं सांगितलं जातं की, येथे गेल्या 8 हजार वर्षांपासून लोकं राहत असतात.
पाओला वेरी सांगतात की, हे शहर लाइम स्टोनच्या डोंगरावर वसलेलं आहे. कदाचित त्यामुळेच येथे फार कमी पर्यटक भेट देत असतात. तुम्ही हे शहर एका दिवसांत फिरूच शकत नाही. येणाऱ्या वर्षभरात पर्यटकांसाठी म्युझिक, रिडिंग, फूड, प्रदर्शन याशिवाय 300 कल्चरल परफॉर्मेन्स असणार आहेत.
सगळ्यांपासून दूर असलेलं 'मातेरा'
मातेरा शहर युरोपमधील शहरांपेक्षा वेगळं शहर आहे. येथे कोणतंही विमानतळ, हायस्पीड स्टेशन आणि मोटरवे नाही. येथील काही लोकांना अशी आशा आहे की, मातेरा सर्व सुखसोईपासून दूर असलं तरिही त्याचं असं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्यामुळेच येथे येणारे पर्यटक एका वेगळ्या संस्कृतिचा अनुभव येथे घेऊ शकतात. आपल्यामध्ये दडलेल्या कलागुणांना बाहेर काढू शकतात. मातेरामध्ये ख्रिस्ती धर्माच्या सुरूवातीच्या काळातील अनेक घरं अस्तित्वात आहेत. येथे अने चित्रपटांची शुटींगही करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये मेल गिब्सन यांचा 'द पॅशन ऑफ क्राइस्ट', पीटर पासोलिनी यांचा 'गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट मॅथ्यू'चा समावेश आहे. फ्रान्सची एरियान बेयो यांचं असं म्हणणं आहे की, मातेराला युरोपची सांस्कृतिक राजधानी बनवल्यामुळे येथे विकास कार्याला चालना मिळेल.