शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

लोहगडावर पावसाच्या दिवसात ट्रेकिंग करण्याची मजा काही औरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 2:07 AM

लोहगड किल्ल्यावर मुंबई - पुणे या दोन्ही ठिकाणांहून जाता येते.पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. तिथून दीड तासाच्या चालीनंतर आपण ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीजवळ रस्त्यालगत एक ओटा असून, त्यावर घोडे, उंट, हत्ती ...

लोहगड किल्ल्यावर मुंबई - पुणे या दोन्ही ठिकाणांहून जाता येते.पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. तिथून दीड तासाच्या चालीनंतर आपण ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीजवळ रस्त्यालगत एक ओटा असून, त्यावर घोडे, उंट, हत्ती अशी एकूण ९ चित्रे आहेत. त्यापुढे हनुमानाची मूर्ती आहे. हे ठिकाण म्हणजे ‘कापला’. म्हणजे येथे ९ प्राण्यांचा बळी दिला असावा असं म्हटलं जातं.याबाबत अनेक आख्यायिका आहेत. खिंडीच्या अलीकडेच असलेल्या गावाचं नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहोचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहोचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करताना चार दरवाजे लागतात. लोणावळ्याहून गाडीने येथे जाता येते. पवना धरणाकडे जाणाºया रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो, तेथून ३ ते ४ किमी अंतरावर लोहगडवाडी आहे. पाहण्याची ठिकाणेगडावर चढताना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गावरून जावे लागते. पायºयांचा वाटेने वर गेल्यावर पहिला लागतो तो गणेश दरवाजा. याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. या दरवाजावर गणेश प्रतिमा आहे. येथे आतील बाजूस शिलालेख आहे व ६ तोफा ठेवलेल्या आहेत. तसेच दिंडी दरवाजातून बुरुजाच्या मध्यावर जाऊन खाली गेल्यावर चोर दरवाजा, शौचकूप, नेढ आहे. दुसरा लागतो नारायण दरवाजा. हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंस पंखविहिन केवल शरभ या प्रकाराशी मिळतीजुळती व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत. तिसरा लागतो सर्वांत प्राचीन हनुमान दरवाजा. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंस पंखविहिन केवल शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. चौथा लागतो महादरवाजा. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हातात द्रोणागिरी तोललेल्या हनुमानाचे शिल्प आहे. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. याला राजा-राणीचं मंदिरसुद्धा म्हणतात. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. याला लोमेश ऋषींची गुहासुद्धा म्हणतात. या कोठीत राहण्याची सोय होते. या कोठीत २२ खोल्या व तळघरात आणखी २ मजले आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे, तिथे एक सुंदर शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक अष्टकोनी विहीर आहे. या विहिरीच्या कोनाड्यात एक शिलालेख आहे. त्यात असा उल्लेख आहे की बाळाजी जनार्दन भानू म्हणजे नाना फडणवीस यांनी ही विहीर बांधली. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा.पाहण्याची ठिकाणेगडावर चढताना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गावरून जावे लागते. पायºयांचा वाटेने वर गेल्यावर पहिला लागतो तो गणेश दरवाजा. याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. या दरवाजावर गणेश प्रतिमा आहे. येथे आतील बाजूस शिलालेख आहे व ६ तोफा ठेवलेल्या आहेत. तसेच दिंडी दरवाजातून बुरुजाच्या मध्यावर जाऊन खाली गेल्यावर चोर दरवाजा, शौचकूप, नेढ आहे. दुसरा लागतो नारायण दरवाजा. हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंस पंखविहिन केवल शरभ या प्रकाराशी मिळतीजुळती व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत. तिसरा लागतो सर्वांत प्राचीन हनुमान दरवाजा. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंस पंखविहिन केवल शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. चौथा लागतो महादरवाजा. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हातात द्रोणागिरी तोललेल्या हनुमानाचे शिल्प आहे. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. याला राजा-राणीचं मंदिरसुद्धा म्हणतात. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. याला लोमेश ऋषींची गुहासुद्धा म्हणतात. या कोठीत राहण्याची सोय होते. या कोठीत २२ खोल्या व तळघरात आणखी २ मजले आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे, तिथे एक सुंदर शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक अष्टकोनी विहीर आहे. या विहिरीच्या कोनाड्यात एक शिलालेख आहे. त्यात असा उल्लेख आहे की बाळाजी जनार्दन भानू म्हणजे नाना फडणवीस यांनी ही विहीर बांधली. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा.इतिहास...लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीसशे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स. १४८९मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्त्वाचा किल्ला होता. इ.स. १५६४मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुºहाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३०मध्ये किल्ला आदिलशाहीत आला.१६५७मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० रोजी मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती.इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२०मध्ये आंगºयांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७०मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. त्यात सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुºयांचे निगराणीत लोहगडावर आणले.१८०२मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला; पण नंतर दुसºया बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसºयाच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.