मेहंदीपूर बालाजी हनुमानाच्या भक्तांसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती भूत आणि प्रेत यांसारख्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी हे एका मुक्ती स्थळाप्रमाणे आहे. दररोज येथे मोठ्या संख्येमध्ये भूत, प्रेम आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी अनेक लोक येत असतात. या मंदिरामध्ये प्रेतराज सरकार आणि भैरवबाबा म्हणजेच कोतवाल कॅप्टनची मूर्ती आहे. प्रत्येक दिवशी 2 वाजता प्रेतराज सरकार यांच्या दरबारामध्ये पेशी म्हणजेच किर्तन करण्यात येतं. या किर्तनामध्ये लोकांवर असलेल्या वाईट शक्तींना दूर करण्यात येतं, असा समज आहे.
काय आहे या मंदिराची वैशिष्ट्य?
राजस्थानातील दौसा जिल्ह्यामधील दोन डोंगरांमध्ये मेहंदीपूर बालाजीचं मंदिर आहे. येथे तुम्हाला अनेक विचित्र प्रकार पाहायला मिळतात. तेथे घडणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्यांदा पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि घाबरूनही जाल. खरं तर विज्ञानाचा भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही तरिही, येथे दरदिवशी अनेक लोक भूत-प्रेत आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी येत असतात.
जाणून घेऊयात येथील काही नियम
मेहंदीपुर बालाजीची मूर्तीच्या समोर राम आणि सीतेची मूर्ती आहे. तसेच या मंदिरामध्ये बाल हनुमानाचीही मूर्ती आहे. येथे येणाऱ्या अनेक भक्तांना येथील काही नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. अशा लोकांसाठी कमीत कमी एक आठवड्यापर्यंत लसूण, कांदा, अंडी, मांस, मद्यपान यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं बंद करावं लागतं.
या मंदिरात प्रसाद खाऊ शकत नाही
मेहंदीपूर बालाजी मंदिरातील कोणताही प्रसाद तुम्ही खाऊ शकत नाही आणि कोणाला देऊही शकत नाही. एवढचं नाही तर येथील प्रसाद तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकत नाही. तसेच कोणतीही खाण्याचा पदार्थ आणि सुगंधित पदार्थ तुम्ही येथून घरी घेऊन जाऊ शकत नाही. असं सांगण्यात येतं की, जर तुम्ही प्रसाद खाल्ला तर वाईट शक्ती दूर होत नाहीत.
असं पोहचू शकता मेहंदीपूर बालाजी मंदिरापर्यंत
जर तुम्ही दिल्ली-एनसीआरपासून ट्रेनद्वारे मेहंदीपूर बालाजी जाण्याचा विचार करत असाल तर येथून मेहंदीपूरसाठी कोणतीही डायरेक्ट ट्रेन नाही. मेंहदीपूरचं सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन बांदीकुई आहे. जे मेहंदीपूरपासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. येथून टॅक्सी बुक करून तुम्ही बालाजी मंदिरापर्यंत पोहोचू शकता.
रस्तेमार्गे
जर तुम्ही तुमची स्वतःची गाडी घेऊन जाण्यार असाल तर बालाजीच्या दर्शनासाठी एनएच 352, ताज एक्सप्रेस हायवे किंवा यमुना एक्सप्रेस हायवेपासून जाऊ शकता. या मार्गांवरून तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 6 तास लागतात. दिल्लीपासून दौसापर्यंत तुम्ही बसनेही प्रवास करू शकता.