(image credit-catch.news)
भारतात पाहायला गेलं तर एकापेक्षा एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय असे किल्ले आहेत. काही किेल्ले असे आहेत ज्या किल्ल्यांच्या मागे् काही रहस्य असतं आणि त्याची कल्पना सुद्धा नसते. हा रहस्यमय किल्ला मध्यप्रदेशात आहे. या किल्ल्याचे नाव गडकुंडार किल्ला आहे.
हा किल्ला मध्यप्रदेशातील कुंडार गावात आहे. झांसीपासून हा किल्ला सुमारे ७० किलोमीटर लांब आहे. गडकुंडार किल्ला हा खूपच रहस्यमय आहे. २००० वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्यात २ फ्लोअरर्सचं बेसमेंट आहे. हा ऐतिहासिक किल्ला ५ मजल्यांचा आहे. ज्यात ३ मजले जमिनीवर आणि २ मजले जमिनी खाली आहेत.
हा किल्ला कोणी तयार केला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण इतिहासकारांच्यामते हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. या किल्ल्यात एकदा संपूर्ण लग्नाची वरात गायब झाली होती असा समज आहे . आतापर्यंत त्या गायब झालेल्या लोकांचा शोध लागलेला नाही. या घटनेनंतर किल्ल्याच्या तळाला जाणारे सगळे दरवाजे बंद करण्यात आले होते.
त्या ठिकाणच्या रहिवासीयांच्यामते वरातीतील लोकांची संख्या ५०- ६० इतकी होती. या घटनेप्रमाणेच अनेक घटना या गडकुंढार किल्ल्यामध्ये घडल्याचं समजतं. असं मानलं जातं की या किल्ल्यात मोठा खजिना आहे. स्थानिक चोरांनी या किल्ल्यातील खजिना शोधण्यासाठी खूप मेहनत घेतली. अनेकांचे जीव सुद्धा गेले. (हे पण वाचा-पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या महाराष्ट्रातील गोवळकोट किल्ल्याला एकदा नक्की द्या भेट!)
इतिहासकारांच्यामते गडकुंढार किल्ला खुप संपन्न आहे. या परिसरात चंदेल, बुंदेल आणि खंगारांचे वर्चस्व होते. या किल्ल्याच्या शासनकर्त्याकडे मोठ्या प्रमाणावर हिरे आणि दागिने असत. म्हणूनच त्यांना दरोडेखोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी खजिना किल्ल्याच्या तळाला ठेवला होता. या किल्ल्याच्या आतील रस्ते खुपचं संभ्रमात टाकणारे आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेला हा किल्ला आहे. अंधारात हा किल्ला खूपच भयावह वाटत असतो. या किल्ल्याच्या इतिहासाबाबत सांगताना शोधनकर्ते असं सांगतात की, हा किल्ला चंदेलांचे मुख्यालय आणि सैनिकांचे तळ होता.
( हे पण वाचा- भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!)