हिवाळ्यात तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतातल्या पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही शांततेत तसंच निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी इन्जॉय करू शकता.
कोल्लम
केरळ राज्यातील कोल्लम या ठिकाणी जाऊन तुम्ही सुट्टी इन्जॉय करू शकता. केरळची राजधानी तिरूवनंतपुरम या ठिकाणांपासून कोल्लम ८० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही अधुनिक जीवनशैली आणि प्राचीन इतिहासातील अनेक गोष्टी पाहू शकता. अधुनिक केरळची शान असलेल्या कोल्लम राज्याबद्दल जाणून घेऊया. कोल्लम या ठिकाणाला आधीच्या काळात केरळचा गेटवे क्विलॉन या नावाने ओळखलं जातं होतं.
एवेंचर पार्क
अष्टमुडी हा झरा आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तिथले स्थानिक लोकं पिकनीकसाठी येतात. महात्मा गांधी बीच पार्क कोल्लम बीचवर आहे. या ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्याची सुविधा असल्यामुळे खवय्येगिरीचा आनंद घेता येईल. सरदार वल्लभ भाई पटेल पुलिस म्यूजियम या ठिकाणी आहे.
या ठिकाणी तुम्हाला केरळच्या प्रशासकीय इतिहासाशी निगडीत प्रतिमा पाहायला मिळतील. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुंचे प्रदर्शन भरवले जाते. कोल्लम लाइब्रेरी और कला केंद्र येथे वाचनाची आवड असलेले लोकं वेगवेगळे ग्रंथ वाचू शकतात. या ठिकाणी वटवृक्षाच्या मुळांना वेगवेगळया सापांच्या आकारात रंगवले आहे.
या ठिकाणी कसं जाल
केरळ राज्यातील कोल्लम रेल्वे स्थानक वेगवेगळ्या मार्गानी भारतातील शहरांशी जोडले गेले आहे. या ठिकाणी जर तुम्ही विमानाने जात असाल तिरुवनंतपुरम हे रेल्वे स्थानक जवळ आहे. जहाजाने सुद्दा तुम्ही एलेप्पीपासून कोल्लमपर्यंत येऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी साध्या हॉटेल्सपासून फाईव स्टार हॉटेसपर्यंत वेगवेगळ्या सुविधा आहेत. या ठिकाणची खासियत असेलेले हाऊस बोटींग तुम्हाला फार आवडेल.