तुम्हाला जर जंगल सफारी करण्यासोबतच अॅडव्हेंचरचा आनंद घ्यायला असेल तर तुम्ही कर्नाटकमधील कुद्रेमुख नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. कर्नाटकातील चिकमंगलूरपासून ९५ किलोमीटर दक्षिण-पश्चिम भागात हे कुद्रेमुख नॅशनल पार्क आहे. जवळपास ६०० वर्गमीटर परिसरात असलेल्या या ठिकाणाला १९८७ मध्ये नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला होता.
कुद्रेमुख नॅशनल पार्क हे त्याच्या सुंदरतेसाठी लोकप्रिय आहे. या नॅशनल पार्कमध्ये वेगवेगल्या प्रजातींचे पक्षी, प्राणी आणि वनस्पती सहज बघायला मिळतात. या नॅशनल पार्कला चार भागांमध्ये विभागण्यात आलं आहे. कुद्रेमुख, केरकाते, कालसा आणि शिमोगा असे हे चार विभाग आहेत. नॅशनल पार्कच्या उत्तर आणि पूर्वेला असलेले कॉफी आणि चहाच्या बागा याच्या सौंदर्यात आणखीन भर घालतात.
काय आहे खासितय?
या नॅशनल पार्कमध्ये येऊन तुम्ही बंगाल टायगर, स्लोथ बिअर, सांबर, जंगली कुत्रे, हरणं असे वेगवेगळे प्राणी तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या प्राण्यांसोबतच इथे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतीही मिळतात. तसेच या पार्कमध्ये जवळपास १९५ प्रकारचे पक्षीही बघायला मिळतात.
ट्रेकिंगचाही घेऊ शकता अनुभव
ट्रेकिंगची आवड असणारे लोक इथे मनभरून एन्जॉय करू शकतात. पण यासाठी तुम्हाला परवानगी घेण्याची गरज पडेल. इथे एक-दोन नाही तर अनेक ट्रेकिंग पॉइंट्स आहेत, जिथे जाण्यासाठी तुम्ही फिजिकली फिट असणं गरजेचं आहे.
आजूबाजूचे हिरवेगार नजारे
वॉटरफॉल्स आणि वाइल्डलाइफ सोबतच तुम्ही इथे चहा आणि कॉफीच्या बागेतही चांगला वेळ घालवू शकता. इथे बसून वेगवेगळे नजारे बघताना वेळ कसा निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही.
कधी जाल?
ऑक्टोबर ते मे हा कालावधी इथे जाण्यासाठी फारच चांगला मानला जातो. पण वाइल्डलाइफ एन्जॉय करण्यासाठी तुम्ही इथे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी महिन्यातही जाऊ शकता.
कुठे थांबाल?
या पार्कमध्ये राहण्यासाठी रेस्ट हाऊस तयार करण्यात आले आहेत. तसेच कालसा, श्रृंगेरी आणि कारकालामध्येही तुम्हाला थांबण्यासाठी अनेक पर्याय आहेत.
कसे पोहोचाल?
विमान मार्गे - फ्लाइटने जाण्याचा विचार करत असाल तर मॅंगलोरहून येथून सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. येथून कुद्रेमुखचं अंतर १२० किमी आहे. एअरपोर्टवरुन तुम्ही टॅक्सीने इथे पोहोचू शकता.
रेल्वे मार्गे - मॅंगलोर सेंट्रल येथील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. येथून पार्कचं अंतर १०० किमी आहे.
रस्ते मार्गे - कर्नाटकातील जास्तीत जास्त शहरांमधून इथे पोहोचण्यासाठी प्रायव्हेट बसेस सुरू असतात.