भारतासारख्या देशात हजारो गावे असतील. पण यातील काहीच गावे हे चर्चेचा विषय ठरतात. सर्वांनाच सर्वी गाबे बघायला मिळतात असेही नाही. पण कधी ना कधी कुणाच्यातरी डोक्यात हा विचार आलाच असेल की, भारतातील शेवटचं गाव कोणतं आणि कुठे आहे? आज आम्ही तुम्हाला भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव कोणतं आहे त्याबाबत सांगणार आहोत. या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता.
तिबेटच्या सीमेवर आहे हे भारतातील शेवटचं गाव
भारत आणि तिबेटच्या सीमेवर वसलेलं छितकुल हे नैसर्गिक सौंदर्याने सजलेलं आहे. खळखळून वाहणारी नदी, उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे असे इथे चित्र आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव 3450 मीटर ऊंचीवर आहे. भारतीय सीमेवरील शेवट्या गावांमध्ये या गावाचा समावेश आहे.
हिमाचल मार्गे किन्नोर जिल्ह्यातील बास्पा घाटातून तुम्ही या गावात जाऊ शकता. बास्पा नदीच्या तटावर या गावातील स्थानिक देवीची तीन मंदिरे बघायला मिळतात. या गावाला किन्नोर जिल्ह्याला क्राऊनही म्हटलं जातं. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलापासून हे गाव 250 किमी अंतरावर आहे.
रोमांचक प्रवास
नारकंडा ते रामपूर, सराहन,वागंटु, करच्छमा, सांगला मार्गे डोंगर रांगातून तुम्ही इथे पोहोचू शकता. इथे ड्रायव्हिंग करणे फारच कठीण आहे. या मार्गावरुन जाताना तुम्हाला बर्फाने वेढलेले डोंगर बघायला मिळतील. डोंगरांमधून निघणाऱ्या छोट्या छोट्या धारा बास्पा नदीला जाऊन मिळतात.
ट्रेकर्ससाठी खास आहे ही जागा
जे लोक ट्रेकिंगचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी ही जागा फारच चांगली आहे. सांगला व्हॅलीच्या कामरु गावात 2600 मीटर उंचीवर कामरु फोर्ट आहे. हा फोर्ट साधारण 15व्या शतकातील आहे. लाकडांनी तयार करण्यात आलेला हा फोर्ट फार सुंदर नक्शीकामाने सजला आहे. या फोर्टवर जाण्यासाठी 500 मीटर अंतर पायी चालावं लागतं.