येणारं नवीन वर्ष सुट्ट्यांच्या बाबतीत तुमच्यासाठी खूपच आनंददायक आणि मस्त इन्जॉयमेंट करता येईल असं असणार आहे. २०२० मध्ये तुम्हाला २०१९ च्या तुलनेत अधिकाधिक सुट्ट्या मिळणार आहेत. तसंच शुक्रवार आणि सोमवार या दोन वारांना सर्वाधीक सुट्ट्या मिळणार आहेत. यामुळे तुम्हाला एकत्रच जास्त दिवस सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.
२०२० मध्ये दसरा, दिवाळी. तसंच स्वातंत्र्य दिन तसंच वेगवेगळ्या अकारा सुट्ट्या या शनीवार आणि रविवारी येत आहेत. ज्यामुळे ऑफिसला जात अससलेल्या खूप लोकांच्या सुट्ट्या या शनिवार रविवार मध्ये जाणार. तसंच २०२० मध्ये सलग दोन दिवस सुट्ट्या अनेकदा मिळणार आहेत. जर तुम्ही या वर्षात लॉंग विकेंण्डला जात असाल तर तुम्हाला २-३ दिवसांची सुट्टी इन्जॉय करता येईल.
महाशिवरात्रि- २१ फेब्रुवारीला शुक्रवार असल्यामुळे तुम्हाला महाशिवरात्र आणि लागून असलेले शनिवार, रविवार यांमुळे तीन सुट्ट्या मिळणार आहेत. या सुट्टीत तुम्ही कुठेतरी लांब फिरायला जाऊ शकता.
होळी- १० मार्च मंगळवारी होळी आहे. तुम्ही जर ९ मार्चला सुट्टी घेतली तर सलग चार दिवस तुम्हाला सुट्टी मिळेल. तुम्ही फिरायला जाण्यासाठी या सुट्टीचा वापर करू शकता.
एप्रिल- या महिन्यात तुम्हाला जास्त सुट्ट्या मिळवण्याचा आनंद घेता येईल. १० एप्रिल गुड फ्रायडे आहे. तसंच १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यांमुळे तुम्हाला सुट्टी असेल १४ एप्रिलला मंगळवार आहे जर तुम्ही सोमवारी सुट्टी घ्याल तर तुम्हाला मोठ्या सुट्टीचा आनंद घेता येईल.
जुलै - ३१ जुलैला बकरी ईद आहे. या दिवशी शुक्रवार असल्यामुळे तुम्हाला पुन्हा जुलै महिन्यात जास्त सुट्ट्या मिळणार आहेत.
ऑगस्ट - ऑगस्ट महिन्यात खूप सुट्ट्या आहेत. ३ ऑगस्टला सोमवार आहे. त्याचदिवशी रक्षाबंधन सुद्दा आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. ११ ऑगस्टला मंगळवार आहे तसंच या दिवशी जन्माष्टमी आहे. जर तुम्ही या वेळी सोमवारी सुट्टी घेतली तर तुम्हाला ४ दिवस सुट्ट्यांचा वापर करता येणार आहे. तसंच १५ ऑगस्टला शनिवार असल्यामुळे तुमची एक सुट्टी वाया सुद्धा जाणार आहे.
(Image credit- fundamentalchidrens)
ऑक्टोबर- २ ऑक्टोबरला शुक्रवार आहे. या आठवड्यात तुम्ही तीन सुट्टयांचा आनंद घेऊ शकता. २४ ऑक्टोबरला नवमी आणि लागूनच दसरा आहे. या दिवशी शनिवार आणि रविवार असल्यामुळे तुमची सुट्टी वाया जाणार आहे. परत महिन्याच्या शेवटाकडे येताना ३० तारखेला गुरूनानाक जयंतीची सुट्टी तुम्हाला मिळणार आहे.
डिसेंबर- २५ डिसेंबरला शुक्रवार असल्यामुळे तुम्हाला सलग ३ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.