- मयूर पठाडेकोणतीही गोष्ट कधीच सांगून येत नाही, त्यामुळे आपण कायमच दक्ष असलेलं बरं. आता हे सांगणं म्हणजे कदाचित तुम्हाला ‘अगोचरपणा’ वाटेल, हे काय तुम्ही काहीही आम्हाला सांगता, आता तुम्हीही आमच्यावर ‘ड्रेस कोड’ लादणार का, असंही काही जण विचारतील, पण खरंच प्रवासात खूप भपकेबाज कपडे घालू नका. ज्यामुळे आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष जाईल आणि आपण ‘विशेष’ नजरेत भरू अशा गोष्टी करणं शक्यतो टाळा.चारचौघांसारखेच कपडे घालूनही आपण आकर्षक दिसू शकतो, पण सगळ्यांत ‘उठून’ दिसण्यामुळे आपला खासगीपणा तर त्यामुळे जातोच, पण कोणतीही गोष्ट खुलेपणानं करण्यालाही मर्यादा येतात. अनेकांचं अनावश्यक लक्ष वेधून आपणच आपल्याला संकटात टाकू शकतो. भले आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी अथवा आपल्या परिचितांकडे पोहोचल्यावर आपल्याला पाहिजे तसे ऐटबाज कपडे घालून आपण साºयांवर छाप पाडू शकतो, पण त्याआधी असं करणं टाळलेलंच बरं.आपण ज्या ठिकाणी जात आहोत, तिथे शक्यतो रात्रीच्या वेळी एकट्यानं बाहेर पडणं टाळा. हा परिसर जर आपल्या परिचयाचा नसेल, आपण पहिल्यांदाच तिथे आलेलो असू, तर हे टाळायलाच हवं. समजा पिकनिकला जरी आपण तिथे आलेले असू, पण ही जागा नॉन टुरिस्ट असली, खूपच एकांतात असली, तर अशा ठिकाणी लुटमारीचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे त्यापासून आधीच सावधगिरी बाळगलेली बरी.बाहेरगावी गेल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या वेळी कुठे पोहोचणार आहोत, आपलं साधारण शेड्यूल काय आहे, याची साधारण कल्पना आपल्या परिचितांकडे द्यायलाच हवी. त्यामुळे नियोजित वेळी जर आपण त्याठिकाणी पोहोचलो नाही, त्याबाबतची कल्पनाही त्यांना देऊ शकलो नाही, तर आपल्या परिचितांना पुढाकार घेऊन काही गोष्टी करता येऊ शकतील.प्रवासात प्रत्येक वेळी असं काही घडेल असं नाही, त्याबद्दल घाबरवण्याचाही उद्देश नाही, पण पोलिसांनीही नुकत्याच जारी केलेल्या या सूचना सगळ्यांनी अंगिकारायला काही हरकत नाही.
‘उठून’ दिसा, पण थोडं जपा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:23 PM
प्रवासात ‘या गोष्टींची काळजी घ्याच..
ठळक मुद्देबाहेरगावी, प्रवासात सगळ्यांत ‘उठून’ दिसण्याचा अट्टहास धरू नका.आपला खासगीपणा तर त्यामुळे जातोच, पण कोणतीही गोष्ट खुलेपणानं करण्यालाही मर्यादा येतात.आपलं रफ शेड्यूल आपल्या परिचितांना माहीत असायला हवं.