शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

कॅम्पिंगसाठी जागा शोधताय? मग या 8 पैकी एखादी जागा निवडा. तंबू ठोका, साहसी खेळ खेळा आणि मजा करा!

By admin | Published: June 09, 2017 6:34 PM

रोजच्या रूटिनचा कंटाळा आलाय, आयुष्यात थ्रील-एक्साइटमेंट हवी आहे, तर मग कॅम्पिंगला जाच !

 

- अमृता कदम

रोजच्या रूटिनचा कंटाळा आलाय, आयुष्यात थ्रील-एक्साइटमेंट हवी आहे, तर मग फिरायला निघा. पण नेहमीसारखं भटकून भटकून पर्यटनस्थळं पहायचा विचार करत असाल, तर जरा थांबा...काही हटके करण्याचा विचार करा. टेन्टमध्ये राहाणं, कँम्प फायर आणि जोडीला साहसी खेळ असतील तर तुमच्या प्रवासाचा आनंद नक्कीच द्विगणित होईल. आपल्याकडे अशी अनेक ठिकाणं आहेत, जी आज केवळ कँम्पिंगसाठीच प्रसिद्ध आहेत.

1.ॠषीकेश

तरु णांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं हे कँम्पिंग डेस्टिनेशन आहे. उत्तराखंडमधल्या या ठिकाणी तरूणाई इथल्या साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येते. इथल्या पर्वरांगांच्या पायथ्याशी किंवा गंगेच्या तीरावर तुम्हाला राहण्यासाठी तंबूही मिळतात. गंगेच्या पाण्याचा आवाज आणि गार वारा, तंबूत घालवेली ती रात्र तुम्ही कधीच विसरणार नाही. रिव्हर राफ्टिंग हा इथला सगळ्यांत लोकप्रिय असा अडव्हेंचर स्पोर्ट आहे.

 

  

2.सोलांग व्हॅली

मनालीपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलांग व्हॅलीमध्ये ग्लेशियर्स आणि हिमाच्छादित पर्वतरांगाचं विलोभनीय दर्शन घडतं. ट्रेकिंग आणि कँम्पिंग दोन्हीसाठी हे अत्यंत आयडियल ठिकाण. हिवाळ्यात इथे स्कीइंगचा आनंद घेता येतो. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर स्कीइंगची जागा पॅराग्लायिडंग, पॅराशूटिंग, झॉर्बिंगसारखे खेळ घेतात. इथे ‘ अटलबिहारी वाजपेयी इन्स्टियूट आॅफ माऊंन्टेनिरींग अ‍ॅण्ड अलायड स्पोर्टस’ आहे. जिथे साहसी खेळांचं रितसर प्रशिक्षणही घेता येतं.

 

3.निओरा व्हॅली जंगल कँप

पश्चिम बंगाल, भूतान, सिक्किम बॉर्डरला लागून असलेली निओरा व्हॅली ही पूर्वोत्तर भारतातली कँम्पिंगसाठीचं महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. 2007 पासून इथे पर्यटनाची सुरूवात झाली. इथून कांचनजुंगा या जगातील दुसऱ्या क्र मांकाच्या उंच शिखराचं थेट दर्शन होतं. कँम्पिग साइटच्या आजूबाजूला असलेल्या एक्सकर्शन्समुळे तुमचा इथला मुक्काम अविस्मरणीय ठरतो. फक्त लांबचा प्रवास असल्यामुळे तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असला पाहिजे इतकंच!

 

               

4.कसौल

हिमाचल प्रदेशातलं हे छोटसं हिलस्टेशन पार्वती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या नदीच्या किनाऱ्यावरच तुम्हाला अनेक कँम्पिंग साइटस पहायला मिळतात. तंबूतून बाहेर नजर टाकली तरी सूचीपर्ण वृक्षाची गर्द वनराई तुमच्या मनाला आणि डोळ्यांनाही विसावा देते. इथे ट्रेकिंगसाठीही पिन पार्वती पास, खीर गंगा, सर पास आणि यांकेर पाससारख्या जागा आहेत. त्यामुळे कसौलला ट्रेकर्सचीही पसंती मिळते.

5.जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

जंगातल्या वास्तव्याचा फर्स्ट हॅण्ड अनुभव घ्यायचा असेल तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कसारखी उत्तम जागा नाही. जंगल सफारी, संध्याकाळची शेकोटी आणि रात्रीच्या शांततेला छेद देणारी रातकिड्यांची किरकिर आणि घुबडांचं घुमणं यापेक्षा एक्सायटिंग अजून काय असू शकतं? इथल्या काही कँम्पिंग साइट्समध्ये तुमच्या विनंतीनुसार लोकनृत्यंही सादर केली जातात.

 

            

6.कूर्ग

भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखलं जाणारं हे टुमदार हिलस्टेशन तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्याचा एक वेगळाच आनंद देतं. चहा-कॉफीच्या मळ्यातून जाणारे रस्ते आणि पश्चिम घाटाचं अद्भुत सौंदर्य यांमुळे तुमच्या कँम्पिंगची मजाच डबल होते. बेट्टागिरीच्या जवळ मस्त तंबू टाकायचे आणि इथल्या निसर्गाशी एकरु प होऊन जायचं.

7.अंजुना बीच गोवा

गोव्यातील प्रत्येक बीचची स्वत:ची अशी खासियत असली तरी कँम्पिगसाठीचं उत्तम ठिकाण म्हणजे अंजुना बीचच.

8.जैसलमेर

राजस्थानच्या वाळंवटात राहण्याचा, तिथल्या संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर जैसलमेरला जायलाच पाहिजे. इथल्या सेराई लक्झरी कँम्पमध्ये तुम्हाला राजस्थानची झलक पहायला मिळते. सोनेरी वाळूतल्या तंबूंमध्ये राहताना राजस्थानी जेवण, संगीत यांचा आस्वाद घेता येतो.