- विनायक पात्रुडकर ‘महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेले उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम असून ‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून ते ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर हे निसर्गरम्य ठिकाण आहे.महाबळेश्वर या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘महान सामर्थ्यवान ईश्वर’ असून खरोचरच हे ठिकाण दिव्य असून त्याला दैवी देणगी लाभली आहे. पर्यटकांना येथे मोहकता, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिकता याचा अनोखा संगम पहायला मिळाते. मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोल अशा तीन खेडेगावांनी महाबळेश्वर शहर निर्माण झाले आहे. मुंबईपासून साधारणत: २८५ कि.मी अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाणी पठार आणि खोल द-यांनी वेढले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात तर हा परिसर जलमय होतो.पण त्याचबरोबर त्याचे सौंदर्य आणखनिच खुलून येते. मुंबईपासून जवळची थंड हवेची ठिकाण म्हणजे लोणावळा -खंडाळा तसेच माथेरानप्रमाणे या ठिकाणावरील पॉईट पर्यटकांना नेहमीच आकर्षक करतात. ऐतिहासीक वारस्याबरोबरच येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गावित्री या पाच न उगम पावत असल्याने क्षेत्र महाबळेश्वर म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.पर्यटकांच्या आकर्षणाची खास ठिकाणे म्हणजे पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, वेण्णा लेक, केइंटटस पॉ, एलीफंट पॉइंट, विल्सन पॉइंट, प्रतापगड, लीग्नमाला धबधबा. तसेच येथील अनेक स्मारके थेट ब्रिटीशकाळात घेऊन जातात. महाबळेश्वरपासून सुमारे १९ कि.मी अंतरावर असलेले पाचगणी हे पाच टेकड्यांच्या कुशीतील ठिकाण पर्यटकांना आपल्याकडे अक्षरश: खेचते.निसर्गाच्या कुशीत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसच्या माध्यमातून राहण्याचीही उत्तम सोय असल्याने कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसेच घनदाट जंगलामध्ये वसलेले महिंद्रा शेरवूड रिसॉर्टही नैसर्गिक सौंदर्याची अनुभती देणारे आहे.महाबळेश्वरमधील हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य असल्याने, या भागात मोठ्याप्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर रासबेरी, जांभळाचा मध ही प्रसिद्ध आहे. पर्यटकांना कोणत्याही हंगामात आपल्याकडे आकर्षीत करणारे हे एक उत्तम ठिकाणी आहे. येथे जाण्यासाठी बस, रेल्वे वा विमान सेवेचाही उपयोग करता येईल.
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 8:13 PM