केरळमध्ये जुळ्या मुलांचं गाव; पण बोलण्यास, फोटो काढण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:12 PM2019-08-15T15:12:11+5:302019-08-15T15:17:39+5:30

आपल्या भारतात अनेक ठिकाणं अशी आहेत जी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणांवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक निसर्गाचं अफाय सौंदर्य अनुभवता येतं. अनकेदा तर आपण जे पाहत असतो त्यावर विश्वासच बसत नाही.

Malappuram is the best destinations in kerala | केरळमध्ये जुळ्या मुलांचं गाव; पण बोलण्यास, फोटो काढण्यास मज्जाव

केरळमध्ये जुळ्या मुलांचं गाव; पण बोलण्यास, फोटो काढण्यास मज्जाव

googlenewsNext

आपल्या भारतात अनेक ठिकाणं अशी आहेत जी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणांवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक निसर्गाचं अफाय सौंदर्य अनुभवता येतं. अनकेदा तर आपण जे पाहत असतो त्यावर विश्वासच बसत नाही. जर तुम्हाला या गोष्टी खऱ्या वाटत नसतील तर तुम्ही या ठिकाणी स्वतः जाऊन अनुभव घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 'गॉड्ल ओन कंट्री' म्हणजे केरळला भेट द्यावी लागेल. तसं पाहायला गेलं तर केरळमधील जवळपास सर्वच ठिकाणं खास आहेत. पण त्यातल्या त्यात या ठिकाणाची बात काही औरच... 

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यामध्ये असलेल्या एका गावामध्ये तुम्हाला अनेक जुळी मुलं पाहायला मिळतील. या गावाचं नाव कोडिन्ही आहे. परंतु, या गावाला जुळ्या मुलांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. जेव्हापासून हे गाव चर्चेत आलं आहे, तेव्हापासून देश-विदेशातील पर्यटकांसह मीडिया आणि रिसर्चर्स या गावामध्ये येतात. एवढचं नाहीतर हे गाव संपूर्ण जगभरातही नावारूपाला आलं आहे. 

जर तुम्ही केरळमध्ये गेलात तर तुम्हाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की, येथे गेल्यानंतर कोणाच्याही परवानगीशिवाय तेथील मुलांचे फोटो काढू नका किंवा त्यांच्याशी बोलूही नका आणि त्यांचे फोटोही घेऊ नका. दरम्यान, इंटरनॅशनल लेव्हलवर हे गाव प्रचंड प्रसिद्ध झाल्यामुळे येथे अनेक लोक भेट देत असत आणि मीडियाचीही दखल वाढू लागली. हे मुलांच्या स्वातंत्र्यामध्ये दखल देत असल्याचं मानून त्यांच्यावर निर्बंध लावण्यात आले. तुम्हाला जर तेथील मुलांशी संवाद साधायचा असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. येथे ग्रामपंचायतीमार्फत एका समीतीची स्थापना करण्यात आली असून ती समीती मुलांचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं काम करते. 

मलप्पुरम जिल्हा आणि मिनी ऊटी 

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी अत्यंत सुंदर ठिकाण. येथील अरिबरा डोंगर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करतात. येथील चेरुपड्डीमला अत्यंत सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण मिनी ऊटी म्हणूनही ओळखलं जातं. तुम्ही येथे कोट्टाकुनु, आर्य विद्या शाला, कडमपुजहा भगवती मंदिर, नेडुमकयम, कोडिकुथिमला यांसारख्या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. 

Web Title: Malappuram is the best destinations in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.