(All Image Credit : wikipedia.org)
भारतात अशा अनेक इमारती आणि शहरं आहेत, ज्यांमध्ये प्राचीन इतिहास आणि त्याचा सुवर्णकाळ दडला आहे. देशातील अनेक प्रसिद्ध इमारतींबाबत तसं अनेकांना माहीत आहेच. पण अजूनही एक अशी इमारत आहे ज्याबाबर फार जास्त लोकांना माहिती नाही. हे ठिकाण म्हणजे मांडू. पश्चिम मध्य प्रदेशातील मालवा क्षेत्रातील विंध्य डोंगरांमध्ये २ हजार फूट उंचीवर असलेले मांडू एक प्राचीन शहर आहे. या शहरात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
आज मांडू देशातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पण अजूनही फार लोकांना या ठिकाणाबाबत माहीत नाही. अजूनही ते हवं तितकं लोकप्रिय झालेलं नाही. या शहराला राजा बाज बहादूर आणि राणी रूपमती यांच्या अमर प्रेमाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. मांडू किल्ला हा ८२ किमी परिसरात पसरला असून हा किल्ला भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.
जहाज महाल आणि प्रवेश व्दार
हा महाल जहाजाच्या आकारात तयार करण्यात आलं होतं. हा महल दोन मानवनिर्मित तलावांच्या मधोमध असा तयार करण्यात आला होता की, बघितल्यावर तो जणू पाण्यावर तरंगतोय असं वाटतं. त्यासोबतच येथील दरवाजे सुद्धा आकर्षकणाचं मुख्य केंद्र आहे. मांडूमध्ये एन्ट्री घेण्यासाठी १२ दरवाजे तयार करण्यात आले होते. मांडूचा मुख्य रस्ता दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो.
हिंडोला महाल ते रूपमती आणि अशर्फी महाल
या महालाच्या भिंती तिरप्या आणि थोड्या झुकलेल्या आहेत, यामुळेच हा महाल हवेत पाळण्यासारखा(हिंडोला) झुलत असल्यासारखा वाटतो. म्हणूनचा या महालाला हिंडोला महाल असं पडलं आहे. हिंडोला महालासोबतच मांडूमधील रूपमती महाल, अशर्फी महाल आणि जामनी मशिद सुद्धा बघण्यासारखी आहे.
आणखीही काही ठिकाणे
वर सांगितलेल्या ठिकाणांसोबतच मांडूमध्ये फिरण्यासाठी आणखीही काही ठिकाणे आहेत. यातही सुवर्ण इतिहास दडलेला आहे. यात होशंग शाहची मशिद, जामी मशिद, नहर झरोखा, नीलकंठ महाल आणि रेवा कुंड यांचा समावेश आहे.
कसे जाल?
१) मांडूला रस्ते मार्गाने सजह जाता येतं. कारण येथील वेगवेगळी ठिकाणे देशाच्या वेगवेगळ्या रस्त्यांची जोडलेली आहेत. धार-इंदोर मार्गे मांडूसाठी रोज बसेस सुरू असतात.
२) मांडूपासून सर्वात जवळचं एअरपोर्ट इंदोर आहे. हे एअरपोर्ट मांडूपासून १०० किमी अंतरावर आहे. हे एअरपोर्ट देशातील वेगवेगळ्या शहरांशी फ्लाइट द्वारे कनेक्टेड आहे.
३) मांडूला जाण्याचा विचार करत असाल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे रेल्वे आहे. कारण यापेक्षा आरामदायी प्रवास दुसरा होणार नाही. मांडूपासून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन रतलामचं आहे.
कधी जाल?
मांडूला फिरायला जाण्यासाठी आणि सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करण्यासाठी सर्वात चांगला वेळ म्हणजे मार्च ते जुलै आहे. तसेच पावसाळ्यातही तुम्ही इथल्या वेगळ्या वातावरणाचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणाचं सौंदर्य आणखी खुलतं.