(Image Credit : indiarailinfo.com)
गोवा म्हणजे, देशासह परदेशी पर्यटकांच्याही आवडीचं टूरिस्ट डेस्टिनेशन. खासकरून गोवा फिरण्यासाठी तरूणाई फार उत्सुक असते. गोव्यामधील सुंदर बीचसोबतच तेथील वास्तूकलाही अनेक पर्यटकांचं मन जिंकून घेतात. येथे येणारे अनेक पर्यटक तिथूनच दुसऱ्या ट्रिपचं प्लॅनिंग सुरू करतात. पण गोव्याला फिरण्यासाठी जाणार असाल तर एक खास वेळ काढूनचं जा. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने गोव्यातील सौंदर्य न्याहाळू शकाल. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गोव्याची ट्रिप केलीच असेल. पण तुम्ही कधी गोव्यातीलच मडगांव या शहराला भेट दिली आहे का? काय सांगता?..... तुम्ही मडगांव नाही पाहिलं? टेन्शन घेऊ नका आणि नेक्स ट्रिप गोव्यातील मडगांवला जाण्यासाठीच प्लॅन करा.
तुम्ही नाईट पार्टिचे शौकीन असाल किंवा कल्चरल लव्हर, नाहीतर तुम्हाला तुमच्या ग्रुपसोबत चिलआउट करायचं असेल. गोवा प्रत्येक प्रकारच्या लोकांचं आवडतं डेस्टिनेशन आहे. एवढचं नाहीतर संस्कृती आणि इव्हेंट आवडणाऱ्या लोकांसाठीही खास ठिकाण आहे गोवा. गोव्यामध्येच असणार मडगांव येथील सांस्कृतीक राजधानी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणाला मरगाव असंही म्हटलं जातं. मडगांव साउथ गोवामध्ये असून येथे तुम्हाला कल्चरल अॅक्टिव्हिटीजसोबतच तेथील हटके पदार्थ, म्युझिक आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करण्याची संधी मिळेल.
मडगांवमध्ये तुम्ही कधीही गेलात तरी तेथे तुम्हाला फेस्टिव्हल मोडच पाहायला मिळेल. म्हणजेच, येथे नेहमीच काहीना काही इव्हेंट सुरू असतातच. मडगांव प्राचीन गोव्यामधील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. येथे हिंदूंचे नऊ मठ आहेत. त्यामुळे या ठिकाणाला मठगाव असंदेखील म्हटलं जातं. पोर्तुगिजांच्या आक्रमणांनंतर मठगांवचं नाव मारगांव, माडगांव अशी ठेवण्यात आली. एवढचं नाहीतर येथील संस्कृतीमध्येही पोर्तुगिज संस्कृतिचाही वाढता प्रभाव दिसू लागला.
कसं पोहोचाल?
मडगावंमधील बीच फार सुंदर आहेत आणि पर्यटनासाठी एकदम स्वर्ग मानले जातात. येथून जवळपास अडिच किलोमीटर अंतरावर कोलवा बीच आहे. जिथे तुम्ही सुमुद्राच्या चमचमणाऱ्या वाळूवर बसून तेथील सौंदर्य न्याहाळू शकता. मारगांव गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टपासून जवळपास 18 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तसेच गोवा रेल्वेस्टेशनवरून जवळपास 16 किलोमीटर अंतरावर आहे.