शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
2
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
3
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
4
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
5
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
7
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
8
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
9
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

मे महिन्याचे अजूनही नऊ दिवस उरलेत. मग चार पाच दिवस धनौल्टीला जाऊन या की!

By admin | Published: May 22, 2017 6:54 PM

धनौल्टी निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केलेलं हे उत्तराखंडमधलं छोटंस हिलस्टेशन. गजबजाटापासून दूर, शांत आणि निवांतही! आवर्जून जावून यावं असचं !

 

-अमृता कदम

मे महिना सरत आलाय. उकाडा हळू हळू वाढतोच आहे. अजूनही कुठे जर फिरायला गेला नसाल तर एक हिल स्टेशन गाठाच. पण यासाठी आधी टूरिस्ट गाइडमधल्या हिलस्टेशन्सला फाटा द्या आणि एकदम नवीन ठिकाण एक्सप्लोअर करा. यासाठी बेस्ट आॅप्शन आहे धनौल्टी. निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केलेलं हे उत्तराखंडमधलं छोटंस हिलस्टेशन. गजबजाटापासून दूर, शांत आणि निवांतही! डेहरादूनपासून धनोल्टी दोन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही डेहरादून-धनौल्टी असाही प्लॅन करु शकता. डेहरादूनहून प्रवासाला सुरूवात केल्यावर वाटेत देवदारांची गर्द झाडी धनौल्टीमध्ये तुम्हाला काय नजारा पहायला मिळणार आहे याची झलक दाखवून देतात. वाटेत लागणारी टुमदार पहाडी गावं मागे टाकत तुम्ही धनौल्टीला पोहचता. समुद्रसपाटीपासून 7500 फूट उंचावरच्या या हिलस्टेशनचं उन्हाळ्यातलं तापमान असतं 21 डिग्रीपर्यंत असतं, तर थंडीत पारा 1 अंशापर्यंत खाली उतरतो. इथे पोहचल्यावरच तुम्ही ठरवून टाका आता कसलीही घाईगडबड नाही, सारं कसं शांत अन निवांत.

सुरकंडा देवीचं मंदिर आणि इको पार्क

धनौल्टीमध्ये फिरण्यासाठी मोजकीच ठिकाणं आहेत, पण सगळीच अतिशय सुंदर. त्यांपैकीच एक म्हणजे सुरकंडा देवीचं मंदिर. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत जायचं असेल तर सरळ पायी निघा. मंदिराकडे जाताना छोटीछोटी दुकानं लागतात. चहा-नाश्त्यापासून गढवाली आणि अन्यपद्धतीच्या कारागिरीच्या वस्तू तुम्हाला मोहात पाडू शकतात. पण इथे फार न रेंगाळता तुम्ही सरळ मंदिरात जा. या प्रशस्त, स्वच्छ आणि सुंदर मंदिरात तुम्हाला मन:शांतीचा मन:पूत अनुभव येईल, जो शहरातल्या धावपळीत सध्या मिसिंग असतो. मंदिरासोबतच इथे अजून एक खास जागा आहे ती म्हणजे इको पार्क. पंधरा एकरांच्या परिसरात पसरलेल्या पार्कमध्ये वळणावळणाच्या पायवाटा, फुलांनी डवरलेली झाडं, ध्यानधारणेसाठी काही खास पॉइंट आहेत. शिवाय मनोरंजनासाठी बर्मा ब्रिज, फ्लाइंग फॉक्ससारखी आकर्षणंही आहेत. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर तुमच्या कॅमेऱ्याला इथे बरंच काही मिळून जाईल. इथून साधारण 200 मीटरच्याच अंतरावर अजून एक इको पार्क आहे.

 

   

धनौल्टी हाइटस आणि इको हटस

धनौल्टीमध्ये पर्यटकांच्यादृष्टीनं राहण्याच्या फारशा सुविधा विकसित झालेल्या नाहीत. पण इथल्या काही मोजक्या हॉटेल्सपैकी गढवाल मंडल विकास निगमचं ‘धनौल्टी हाइट्स’ हे राहण्यासाठी चांगल आहे. रूमच्या बाहेर संध्याकाळी मस्तपैकी खुर्ची टाकून निसर्गाची शोभा पहायची. विशेषत: रात्री निरभ्र आकाशात चांदण्या पाहण्याचा आनंदच काही और आहे.

जर हॉटेल रूम्समध्ये रहायचं नसेल तर तुम्ही इथल्या टुमदारशा इको हट्समध्येही राहू शकता. ही इको हट्स उत्तमरित्या मेण्टेन केलेली आहेत. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या इको हट्समध्ये पूर्णपणे सौर उर्जेचा वापर करून वीज, टीव्ही, फोन चार्जर, गरम पाणी या सगळ्या सुविधा मिळतात. समोरच्या लॉनमध्ये देवदारच्या झाडाखाली बसून चहा आणि नाश्त्यावर ताव मारताना सगळं काही विसरायला होतं.

            

डेहरादून

धनौल्टी हे काही खूप फिरण्यासारखं नाही, तर शांतपणे राहण्यासारखं ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही डेहरादूनलाही एखाद-दोन दिवस घालवू शकता. धनौल्टीहून जेव्हा तुम्ही डेहरादूनला परत येता तेव्हा तुम्हाला वाटेत पाहण्यासारखी दोन ठिकाणं आहेत एक म्हणजे शिव मंदिर आणिदुसरं म्हणजे रॉबर्स केव्हज. डेहरादूनच्या चौदा किलोमीटर अलिकडे असलेलं हे शिवमंदिर पहायला वाट वाकडी करण्याचीही गरज नाही. रस्त्याला लागूनच असलेलं हे भव्य मंदिर तुमचं लक्ष वेधून घेईलच. डेहरादूनला पोहचल्यावर तुम्ही रॉबर्स केव्हसला जाऊ शकता. इथले रहिवासी याला ‘गुच्चुपानी’ म्हणतात. इथे गुडघ्यापर्यंत पाणी असलेली कातळांमध्ये दडलेली भुयारासारखी लांब वाट आहे. या थंड पाण्याचा स्पर्श, हलका-हलका काळोख तर कधी चुकूनमाकून डोकावल्यासारखी वाटणारी प्रकाशाची तिरीप. हा अनुभव तुम्ही आयुष्यभर विसरु शकणार नाही. उन्हाळ्याचे आता थोडेसेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे आता फार विचार न करता धनौल्टीच्या ट्रीपचं प्लॅनिंग करून टाकाच्. पाच-सहा दिवस उकाड्यापासून दूर जावून एक कूल कूल अनुभव तुम्ही नक्की घेवू शकता.