शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

मनाजोगत्या सहलीचा मॉर्डन फंडा ‘ कस्टमाइज्ड टूर’

By admin | Published: April 04, 2017 6:42 PM

हल्ली प्रवासाचं आॅनलाइन नियोजन करता येत असल्यामुळे कुटुंबाबरोबर सहलीला जाणं, प्रवास करणं, मनाजोगती ठिकाणं पाहणं आणि सहलीदरम्यानचा निवांत ब्रेक अनुभवणं हे अगदीच सुखद झालं आहे.

- अमृता कदमहल्ली प्रवासाचं आॅनलाइन नियोजन करता येत असल्यामुळे कुटुंबाबरोबर सहलीला जाणं, प्रवास करणं, मनाजोगती ठिकाणं पाहणं आणि सहलीदरम्यानचा निवांत ब्रेक अनुभवणं हे अगदीच सुखद झालं आहे. हातात स्मार्टफोन्स आल्यापासून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एका क्लिकवर बँकेचे व्यवहार, शॉपिंग, सिनेमाची तिकिटं बुक करणं, हॉटेलमध्ये टेबल बुक करणं घरबसल्या होतात. याच तंत्रज्ञानामुळे प्रवास करणंही आता पूर्वीसारखं जिकरीचं राहिलं नाही. काही वर्षांपूर्वी प्रवास म्हणजे ट्रॅव्हल एजंटकडे खेपा घालणं, स्वत:चं ट्रीप प्लॅन केली असेल तर इच्छित ठिकाणी पोहचल्यावर चांगलं हॉटेल शोधणं, गाइडनं दाखवलेली ठराविक स्थळं पाहणं, शॉपिंगचा एक ठरलेला कार्यÞक्र म पार पाडणं असं काहीसं चित्र होतं. पण आता एका जागी बसून आपण स्वत:च आपली ट्रीप मस्तपणे प्लॅन करु शकतो. दोन वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे. आम्हाला सहा-सात दिवसांची दक्षिण भारतातली ट्रीप करायची होती. पण अनेक ट्रॅव्हल कंपन्यांकडे उपलब्ध असलेली टेलरमेड पॅकेजेस नको होती. आम्हाला मैसूर, कूर्ग आणि उटी अशी सफर करायची होती. कूर्गवरु न उटीला जाताना मदुमलाईची जंगल सफारी करायची होती. आम्हाला हवी असलेली स्थळं, आमच्याकडे असलेला वेळ, आमच्या सोयीच्या तारखा ‘मेक माय ट्रीप’च्या माध्यमातून आमची सगळी ट्रीप मनाप्रमाणे अरेंज करता आली. फ्लाईटचं तिकिट बुकिंग, हॉटेल्स, फिरायला वाहन सगळं काही विनासायास झालं. हा ‘कस्टमाइज्ड टूर’चा प्रकार. अनेकजण आज अशाच पद्धतीनं आधी नेटवरून वेगवेगळी लोकेशन्स एक्सप्लोअर करून आपल्या प्रवासाचं नियोजन करतात. सिमला-कुलू-मनाली, दहा दिवसांत दक्षिण भारत, पंधरा दिवसांत संपूर्ण युरोप हे प्रकारच कालबाह्य होत चालले आहेत. प्रवासाचं आॅनलाइन नियोजन ही आता इतकी सामान्य गोष्ट झालीये की भारतातल्या ई-कॉमर्स इंडस्ट्रीच्या एकूण उलाढालीमध्ये आॅनलाइन ट्रॅव्हल क्षेत्राचा वाटा तब्बल 61 टक्के इतका आहे. कन्सलटन्सी फर्म केपीएमजी आणि कॉनफेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीनं जाहीर केलेली ही आकडेवारी आहे. ट्रॅव्हल प्लॅनिंग आणि सर्च इंजिन Ixigo वरच्या आकडेवारीनुसार तर 2020 पर्यंत भारत जगातलं तिसरं सर्वांत मोठं आॅनलाइन ट्रॅव्हल मार्केट बनेल. सध्याचा विचार केला तर भारताचा आॅनलाइन ट्रॅव्हलच्या बाजारपेठेत नववा क्र मांक आहे. आज भारतातल्या आॅनलाइन ट्रॅव्हल बिझनेसमधलं सगळ्यांत महत्त्वाचं नाव म्हणजे मेक माय ट्रीप. दीप कार्ला यांनी 2000 साली जेव्हा ही कंपनी सुरु केली, तेव्हा त्यामागचा उद्देश केवळ भारताला भेट देण्याचं नियोजन करणाऱ्या एनआरआयना त्यांच्या ट्रॅव्हल प्लॅन्ससाठी मदत करणं हाच होता. जेव्हा डॉट कॉमचा ट्रेंड सुरु झाला तेव्हाच दीप यांनी या क्षेत्रात थोडंसं नावीन्य दाखवलं, कल्पनाशक्ती लढवली तर या क्षेत्रात भविष्यात भरपूर संधी आहेत, हे ओळखलं. आज सतरा वर्षांनंतर ‘मेक माय ट्रीप’ संपूर्णपणे ट्रॅव्हल कंपनी बनली आहे. विमान तिकिटं बुक करणं, देशातील आणि आंतरराष्ट्रीय हॉलिडे पॅकेजेस, हॉटेल रिझवर््हेशन्स, गाड्यांची सोय, बस आणि ट्रेनची तिकिटं सगळं काही ‘मेक माय ट्रीप’मध्ये मिळू शकतं. 2015 मध्ये ‘राइटस्टे’च्या माध्यमातून ‘मेक माय ट्रीप’ने ट्रॅव्हल बिझनेसमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकलं. सध्या ‘राइटस्टे’कडे देशभरात दहा हजारांहून जास्त प्रॉपर्टी रजिस्टर्ड आहेत ज्यामध्ये गेस्टहाऊस, व्हिलांचाही समावेश आहे. लोकांच्या प्रवासाच्या पद्धतीत झालेला अजून एक बदल म्हणजे फाइव्ह स्टार हॉटेल्सच्याऐवजी बजेट हॉटेल्स आणि होमस्टेला दिलं जाणारं प्राधान्य. होमस्टेमुळे त्या त्या ठिकाणची संस्कृती अधिक जाणून घेता येते, तिथलं खाणं-पिणं, राहणीमान अधिक समजून घेता येतं. नेटवर ही माहितीही सहजपणे मिळू शकते. राहण्याच्या या बदलत्या पद्धतीमुळे गेल्या काही वर्षांत केवळ राहण्याची सोय करणारे ओयो, फॅब हॉटेल्स, ट्रीबो यांसारखे नवीन नवीन स्टार्ट अपही सुरु झाले आहेत. प्रत्येकाला त्यामुळे आपल्या खिशाला परवडतील अशीच पण नीट व्यवस्था देणारी हॉटेल्स मिळू शकतात. पूर्वी प्रवासाची संकल्पना ही रोजच्या धकाधकीतून ब्रेक एवढीच होती. आता मात्र लोकांना हटके ठिकाणं पहायला, प्रवासादरम्यान काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायचं असतं. त्यामुळेच सोशल मीडिया, ट्रीप अ‍ॅडव्हायझर, लोनली प्लॅनेट अशा वेगवेगळ्या माध्यमांची मदत घेतली जाते. गोफ्रोचे संस्थापक आणि सीईओ अमिताभ मिश्रा यांचं निरीक्षण याबाबतीत खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यामते 1990 नंतर ट्रॅव्हल व्यवसायाचे आयामच बदलत गेले आहेत. पूर्वी प्रवासाच्या नियोजनातील बेसिक अपेक्षा म्हणजे तिकिट बुकिंग प्रक्रि या सहज-सुलभ असणं. पण आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुमच्या ग्राहकांशी थेट जोडलं जाता येतं. त्यांच्या अपेक्षा जाणून घेता येतात. त्यामुळे ट्रॅव्हल कंपन्यांनाही स्वत:साठी वेगवेगळ्या संधी शोधण्यात मदत होते. एकूणच या आॅनलाइन नियोजनामुळे प्रवासाला निघणं म्हणजे बॅग पॅक करु न घराबाहेर पडणं इतकं सोप्पं झालं आहे.