सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून तुम्हीही कुठेना कुठे फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत असाल. आपल्यापैकी प्रत्येकजण यूरोप, लंडन अशा परदेशातील ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असतात. परंतु याऐवजी तुम्ही आपल्याच देशातील काही हटके ठिकाणांना भेट देऊ शकता. आपल्या देशातही अनेक अशी ठिकाणं आहेत, जी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासाठी ओळखली जातात. त्यापैकी काही ठिकाणांबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. या ठिकाणांना भेट दिल्यानंतर तुम्हाला विदेशात फिरायला जाण्याची इच्छाच होणार नाही. जाणून घेऊया या हटके ठिकाणांबाबत...
अहमदनगर, निगहोज पॉटहोल्स
पुणे-अहमदाबाद रोडच्या जवळ असलेलं हे ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हाला इतर ठिकाणी जाण्याची इच्छाच होणार नाही. येथे असणाऱ्या कुकडी नदीवर तयार झालेल्या नॅचरल पॉटहोल्सचं सौंदर्य म्हणजे एक अद्भूत अविष्कारचं. याव्यतिरिक्त बेसॉल्ट रॉक्सवर तयार झालेले कर्व्स आणि बीचवरून वाहणाऱ्या पाण्याचं दृश्य अत्यंत सुंदर आहे.
उदुपी, मारावंथे
जर तुम्ही कर्नाटकमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही उदुपीला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. या किनाऱ्यावरील शांतता आणि दूरवर पसरलेला अरबी समुद्र तुमचं मन मोहून टाकेल. येथे तुम्ही विशाल अरबी समुद्र, हिल पॉइंट्स आणि सुपरनिका नदीमध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
जामनगर, नरारा मरीन नॅशनल पार्क
गुजरातमधील जामनगरमध्ये असलेल्या नरारा मरीन नॅशनल पार्कमध्ये सी कोरल पाण्याच्या तळाशी अगदी सहज दिसतात. गल्फ ऑफ कच्छच्या जवळ असलेल्या या पार्कमध्ये सी कोरल पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर समुद्राच्या आतील जीवन अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही सागरी तळाशी असलेल्या जीवनशैलीचा अनुभव घेऊ शकता.
जबलपुर, भेडाघाट
तुम्ही संगमरवराचा वापर करून बांधण्यात आलेल्या अनेक इमारती पाहिल्या असतील परंतु येथे तुम्हाला संगमरवराचे डोंगर पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त येथे एक धबधबादेखील आहे. जो पाहून तुमचं मनंही खूश होऊ शकतं. तुम्ही येथे संगमरवराच्या डोंगररांगामधून वाहणाऱ्या नर्मदा नदीमध्ये बोटींगचा आनंदही घेऊ शकता.