सध्या वातावरणातील उष्णता वाढत असून लवकरच परिक्षा संपून मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टा लागणार आहेत. अशातच तुम्ही समर वेकशनसाठी ट्रिप प्लॅन करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही सजेशन्स देणार आहोत. उन्हाळा आणि समुद्र किनारे हे न तुटणारं समीकरण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच समर ट्रिपसाठी एखाद्या समुद्र किनारी फिरायला जायचं म्हटलं की, सर्वांच्या मनात गोव्याचे समुद्र किनारे येतात. पण तुम्हाला माहीत आहे का? गोव्याव्यतिरिक्त अनेक समुद्रकिनारे आहेत, जे आपल्या वेगळ्या अंदाजासोबतच निसर्गसौंदर्यासाठीही ओळखले जातात. तुम्हालाही निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना भेट देण्याची इच्छा असेल तर बंगळुरूमधील समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या. जाणून घेऊया बंगळुरूमधील सुंदर समुद्र किनाऱ्यांबाबत...
करवर बीच
करवर बीच आपल्या रहस्यमयी सौंदर्यासाठी ओळखलं जातं. अत्यंत सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला या बीचवर तुम्ही धमाल करू शकता. पर्यटकांसाठी येथे अनेक प्रकारच्या खेळांचं आयोजन करण्यात येतं. (Image Credit : natgeotraveller.in)
देवबाग बीच
तुम्हाला जर एखाद्या प्रदेशातील विशिष्ट लाइफस्टाइलचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा तरी या बीचला भेट द्या. या प्रदेशातील संस्कृती जाणून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात.
कोप बीच
या बीचवर तुम्ही मावळत्या सुर्याचं दर्शन घेऊ शकता. मावळत्या सुर्याची किरणं पाण्यावर आणि वाळूवर पडल्यावर हा बीच जणू काही सोन्याची चादर पांघरल्यासारखाच दिसतो. (Image Credit : LBB)
मालपे बीच
या समुद्रकिनाऱ्यावर फिरताना तुम्हाला निसर्गाच्या आश्चर्याचा आनंद अनुभवता येईल. या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा सुमुद्राच्या लाटा येतात. त्यावेळी त्या किनाऱ्यावरील झाडांना स्पर्श करून जातात. हा बीच रोमॅन्टिक ट्रिपसाठी उत्तम डेस्टिनेशन आहे.
ओम बीच
हा बीच आपल्या आकारासाठी ओळखला जातो. 'ओम' आकारामध्ये असलेला हा बीच नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतो. येथील निसर्गसौदर्य पाहून तुम्ही येथे पुन्हा जाण्याचा प्लॅन कराल.