नुकतंच अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरला व्हॅंकूवरच्या रस्त्यांवर एन्जॉय करताना पाहिलं गेलं. हे फोटो शिबानीने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. कॅनडातील आठवं सर्वात मोठं शहर असलेल्या व्हॅंकूवर आपल्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे. व्हॅंकूवर हे उत्तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्कनंतर तिसरं सर्वात मोठं फिल्म मेकिंग डेस्टिनेशन आहे. त्यामुळे या शहराला उत्तरेतील हॉलिवूड या नावानेही ओळखले जाते. इथे अशा अनेक जागा आहेत ज्यांना भेट देऊन तुम्ही तुमची सुट्टी खास एन्जॉय करु शकता.
कॅपिलानो रिव्हल नॅशनल पार्क
नॉर्थ व्हॅंकूवरमध्ये असलेल्या रीजनल पार्क मेट्रो व्हॅंकूवर व्दारे संचलित एकूण २१ रिजनल पार्कपैकी हा एक पार्क आहे. त्यासोबत हे ठिकाणा अॅडवव्हेंचर स्पोर्ट्स जसे की, बायकिंग, कयाकिंगसाठी यासाठीही प्रसिद्ध आहे.
व्हॅंकूवर अॅक्वेरिअम
स्टेनली पार्कमध्ये असलेलं हे अॅक्वेरिअम पर्यटकांची सर्वात पसंतीची जागा आहे. इथे परिवार आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येतो. हे अॅक्वेरिअम मरीन रिसर्च आणि मरीन अॅनिमल रिहॅबिलिटेशन सेंटरही आहे.
द सीवॉल
जगातली सर्वात लांब म्हणजे २० किमी सीवॉस वॉकिंग ते सायकलिंग आणि जॉगिंगसाठी ही परफेक्ट जागा आहे. आपल्या पार्टनरसोबत तुम्ही इथे फार चांगला वेळ घालवू शकता.
ग्रानविले आइलॅंड पब्लिक मार्केट
फिरण्यासोबतच जर तुम्ही खाण्या-पिण्याचे शौकीन असाल तर ग्रानविले आइलॅंड पब्लिक मार्केटला नक्की भेट द्या. या मार्केटमध्ये फिरण्यासाठी २ तासांचा वेळ लागतो. इथे तुम्ही व्हॅंकूवरमधील खास पदार्थांबाबत जाणून घेऊ शकता.
कॅपिलानो सस्पेंशन ब्रिज
१४० मीटर लांब आणि ७० मीटर ऊंच नदीवर हा पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल पाहण्यासाठी वर्षात ८ लाख पर्यटक येतात. आजूबाजूला असलेली हिरवळ आणि त्यामध्ये उभारलेला हा पूल आउटिंगसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे.