शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

सोलो ट्रेकिंग आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट आहे उत्तराखंडमधील 'रूपकुंड'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 11:42 AM

पावसाळ्यामध्ये सोलो ट्रिप म्हणजेच, एकट्यानेच ट्रॅवलिंगची गंमत अनुभवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत.

(Image credit : Thrillophilia)

पावसाळ्यामध्ये सोलो ट्रिप म्हणजेच, एकट्यानेच ट्रॅवलिंगची गंमत अनुभवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत. हे ठिकाण म्हणजे, निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि नयनरम्य दृश्यांची पर्वणीच. दूरदूरपर्यंत पसरलेली हिरवळ आणि डोंगररांगा, ट्रेकिंग आणि अ‍ॅडव्हेचर यांसारख्या मन प्रसन्न करू टाकणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येतील. त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी अजिबात वेळ वाया न घालवता अनेक गोष्टींचा आनंद लूटू शकता. उत्तराखंड म्हणजे, हिमालयाच्या कुशीत वसलेलं सुंदर ठिकाण. आज आम्ही तुम्हाला जे ठिकाण सांगणार आहोत, ते उत्तराखंडमधीलच आहे. 

(Image credit : trekdestinations.com)

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये स्थित असलेलं रूपकुंड ट्रॅक. येथे दूरदूरपर्यंत पसरलेलं घनदाट जंगल आहे. असं म्हटलं जातं की, ही जागा फार रहस्यमयी आहे. तसेच चौफेर पसरलेली हिरवळ आणि पर्वतरांगा या ठिकाणाला आणखी खास बनवतात. हे ठिकाण हिमालयाच्या दोन शिखरं त्रिशूल आणि नंदघुंगटीच्या तळाशी स्थित आहे. या जागेवर नेहमी ट्रेकिंग आणि अ‍ॅडव्हेचर्सची आवड असणाऱ्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. येथे काही मंदिर आणि एक छोटासा तलावही आहे. जे या रूपकुंडचं सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त येथे वाहणारे झरेही अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. 

रूपकुंडला कंकाल झील असंही म्हणतात...

दरम्यान, रूपकुंडला कंकाल झील असंही म्हटलं जातं. यामागेही एक रोचक कथा दडलेली आहे. येथील स्नानिकांच्या सांगण्यानुसार, 1942मध्ये येथे 500हून अधिक मानवी सांगाडे आढळून आले होते. तेव्हापासूनच या तलावाला कंकाल झील म्हणजेच, सांगाड्यांचा तलाव असं म्हटलं जातं. ज्यावेळी या सांगाड्यांचे परिक्षण करण्यात आले. त्यावेळी असं समोर आलं की, हे मानवी सांगाडे 12व्या आणि 15व्या शतकातील लोकांचे आहेत. दरम्यान, रूपकुंड तलाव थंडीमध्ये पूर्णपणे गोठून जातो. 

(Image credit : blog.weekendthrill.com)

कसे पोहोचाल? 

रूपकुंडला जाण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हरिद्वारला पोहोचावं लागेल. त्यानंतर ऋषिकेश आणि तिथून देवप्रयागमार्गे श्रीनगर गढवाल. तिथून पुढे कर्मप्रयाग आणि थराली, देबाल, वांणबेदनी, बुग्याल त्यानंतर बुखुवाबासा. येथून तुम्ही केलू विनायकमार्गे जाऊन तुम्ही पोहोचाल रूपकुंडला. याशिवाय तुम्ही काठगोदाम मार्गेही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता. 

दरम्यान, तुम्ही फक्त रूपकुंडला जाण्याऐवजी व्यवस्थित ट्रिप प्लॅन करून रूपकुंडसोबतच इतरही अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनTrekkingट्रेकिंगMonsoon Specialमानसून स्पेशल