प्रत्येकालाच फिरायला आवडतं, फक्त फिरण्याची आवड वेगळी असते. थोडं गोंधळला असाल ना? म्हणजे, काहींना शांत-निवांत ठिकाणी फिरायला आवडतं, तर काहींना ऐतिहासिक ठिकाणां भेट द्यायला आवडतं. पण आपल्यापैकी अनेकजण असे असतात. ज्यांना प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. नेहमीच ते हटके गोष्टी करण्यासाठी तयार असतात. अशातच अनेकजण देशविदेशातील ठिकाणांना भेट देवून नवनवीन ठिकाणांचा आस्वाद घेत असतात. तसेच नवीन ठिकाणांच्या शोधात असतात.
तुम्हालाही अॅडवेंचर्स करायला आवडतं का? किंवा बीझी शेड्यूलमधून सुट्टी घेऊन काही तुफानी करण्याच्या विचारात आहात? तर तुम्ही एकदा तरी अमेरिकेतील कोलोरेडो नदीमध्ये असलेल्या ग्रॅन्ड कॅन्यनला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला अडवेंचर्ससोबत निसर्गाचा चमत्कार पाहण्याचा अनुभव अनुभवता येईल.
ग्रॅन्ड कॅन्यन दरी अमेरिकेतील एरिजोना राज्यापासून सुरू होऊन वाहणाऱ्या कोलोरेडो नदीच्या प्रवाहातून तयार झालेली निमूळती दरी आहे. ही दरी ग्रॅन्ड कॅन्यन नॅशनल पार्कने वेढलेली असून हे अमेरिकेतील सर्वात पहिल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक होतं.
भू-वैज्ञानिकांच्या मते, कोलोरेडो नदीच्या प्रवाहामुळे ग्रॅन्ड कॅन्यन दरी जवळपास 60 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली होती. ही दरी 446 किलोमीटर लांब आणि सहा हजार फूट खोल आहे. 227 किलोमीटर लांब या दरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर यांची रूंदी 6.4 ते 29 किलोमीटर आहे आणि खोली 183 किलोमीटर इतकी आहे.
कोलोरेडो नदीमध्ये पर्यटक वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत असतात. एवढचं नाही तर पर्यटकांना ही विशाल दरी पाहता यावी यासाठी येथे हवाई सफर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
अनेक पर्यटक दूरवरून ही दरी पाहण्यासाठी येथे येत असतात. ही दरी म्हणजे निसर्गाचा चमत्कार असल्याची प्रचिती येते. एवढचं नाही तर ग्रॅन्ड कॅन्यन अमेरिकेतील सर्वात मोठ्या पर्यटन केंद्रापैकी एक आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूडवेल्ट यांनी ग्रॅन्ड कॅन्यन पार्कला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषीत केले होते. आज येथे अनेक प्राण्यांना संरक्षित करण्यात आले आहे.