(Image Credit : CruiseMapper)
बांग्लादेशची सफर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आता या प्रवासाचा आनंद क्रूझने घेऊ शकता. नुकतीच इंडो-बांग्लादेश रिव्हर क्रूझने बांग्लादेश ते कोलकाता असा प्रवास सुरू करण्यात आला आहे. दोन्हीं देशांमध्ये हा क्रूझ प्रवास ब्रम्हपुत्रा नदीवर सुरू झाला आहे. दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान बांग्लादेशची राजधानी ढाका अशी की क्रूझ सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. या देशात कार्गोची एक यशस्वी ट्रायलही घेण्यात आली आहे. म्हणजे लवकरच तुम्हाला या क्रूझवर फिरायला जायला मिळेल.
(Image Credit : TripAdvisor)
क्रूझ शिप एमव्ही महाबाहु २९ एप्रिलला ३० प्रवाशांसोबत १७ दिवसांच्या टूरला निघाली आहे. यात ९ देशांचे पर्यटक आहेत. एमव्ही बाहुबलीने आपला प्रवास आसामच्या पांडू या बंदरातून सुरू केला. आसाम ते ढाका असा प्रवास करत क्रूझ कोलकाताला पोहोचेल. या क्रूझवर असलेले पर्यटक यूनेस्कोच्या हेरिटेज यादीतील अनेक ठिकाणांना भेट देतील. यात आसामचं मानस नॅशनल पार्क, बांग्लादेशचं बागेरहाट मशिद शहर आणि सुंदबनसारख्या ठिकाणांचा समावेश आहे.
(Image Credit : Brahmaputra River Cruise)
एमव्ही महाबाहु क्रूझच्या डायरेक्टर नीना मोरादा यांनी सांगितले की, या प्रवासावर निघणाऱ्या प्रवाशांना आसाम, बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या दक्षिण भागाला बघायचा संधी मिळेल. या प्रवासात पर्यटकांना अनेक ऑफबीट ठिकाणे बघता येणार आहेत.
(Image Credit : Deccan Herald)
प्रवासी या टूर दरम्यान अनेक रोमांचक अॅक्टिव्हिटी एन्जॉय करू शकतात. आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये एलिफंट आणि जीप सफारीचा आनंद ते घेऊ शकतात. या पार्कमध्ये ५५ पेक्षा अधिक प्राण्यांसोबत ४२० पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघायला मिळतील. तसेच इथे बंगाल टायगर, कॅप्ड लॅंपर, वॉटर बफेलो असे अनेक प्राणी बघायला मिळतील. एकूण १२५० किलोमीटरच्या या प्रवासात पर्यटकांना सुंदरबनची सुंदरता न्याहाळता येणार आहे.