मेघालय हे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी हे राज्य चांगलंच प्रसिद्ध आहे. येथील दाट जंगले, डोंगरं पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. निसर्ग प्रेमींसाठी हे राज्य फिरण्यासाठी नेहमीच पसंतीचं ठरलं आहे. तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही मेघालयातील काही ऑफबीट ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
उमदेन
मेघालयातील ऑफबीट स्थळांमध्ये तुम्ही री भोई जिल्ह्यातील उमदेनला भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता. हे एका सुंदर ठिकाण असून हिरव्यागार झाडांनी झाकलेले उंचच डोंगरांनी झाकलेलं आहे. शिलॉंगहून हे शहर ६५ किमी अंतरावर आहे. विणकाम करणारे लोक या शहरात अधिक राहतात. त्यासाठीच हे शहर ओळखलं जातं. येथील नागरिक सिल्कच्या माध्यमातून वेगवेगळी परंपरागत कलाकृती तयार करतात. तुम्हीही येथून रेशमच्या उत्पादनांबाबत सगळी माहिती घेऊ शकता. येथील आजूबाजूच्या जंगलात तुम्ही मनसोक्त फिरुन आपला ताण-तणाव विसरु शकता. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे जवळून बघायला मिळतील. इथे तुम्ही ट्रेकिंग आणि हायकिंगचाही आनंद घेऊ शकता. ट्रेकर्स आणि कॅपर्ससाठी हे आदर्श स्थळ मानलं जातं.
मावलेनगोट
मेघालयाची ऑफबीट सुंदरता बघण्यासाठी तुम्ही मावलेनगोटला फिरण्याचाही प्लॅन करु शकता. हे ठिकाण शिलॉंगपासून ४२ किमी अंतरावर आहे. हे एक सुंदर गाव असून हिरव्यागाग डोंगरात आणि चहाच्या बागांमध्ये वसलं आहे. येथील वातावरण फार शांत आहे, त्यामुळे इथे तुम्हाला मानसिक आणि आत्मिक शांततेचा अनुभव घेता येऊ शकतो. एक रिलॅक्स वेळ घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण म्हणता येईल. येथील लोकंही फार चांगल्या स्वभावाचे असून त्यांची मदत फिरण्यासाठी होऊ शकते. तसेच येथील खास वेगळ्या पदार्थांचीही चव तुम्ही चाखू शकता.
कांगथांन
काही लोक हे वेगळ्या अनुभवासाठी कांगथांनला जाण्याचा प्लॅन करु शकता. कांगथांग हे मेघालयातील सर्वात जास्त आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक सुंदरता नेहमीट पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणाला भारताचं व्हिसलिंग गावही म्हटलं जातं. कारण येथील लोक ऐकमेकांशी संपर्क साधण्यासाठी शिटी वाजवतात. या सुंदर गावात येथील सुंदरतेने तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल.
मॉफलांग
शिलॉंगपासून केवळ २४ किमी अंतरावर मॉफलांग हे ठिकाण आहे. हिरवीगार डोंगरं आणि शेतीने गाव वेढलेलं आहे. हे गाव शिलॉंगहून एक विकेंड गेटनेच्या रुपातही ओळखलं जातं. निसर्ग प्रेमींना हवा असलेला नजारा इथे त्यांना बघायला मिळू शकतो. येथील मनमोहक वातावरण तुमच्या मनाला कधीही न मिळालेली शांतता देणार हे नक्की. येथील संस्कृतीही तुम्हाला इथे बघायला मिळेल.