जर तुम्हीही कामाच्या व्यापातून थोडासा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा विचार करत असाल आणि काश्मिर, गोवा आणि मुन्नार व्यतिरिक्त एकाद्या नवीन डेस्टिनेशनच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एका नव्या ऑफबीट डेस्टिनेशनबाबत सांगणार आहोत. कर्नाटकच्या मांडा जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातील डोंगररांगांमध्ये वसलेलं 'कुंती बेट्टा' हे उत्तम डेस्टिनेशन आहे. येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर दृश्य पाहायला मिळतील. येथ मावळणाऱ्या सूर्याच्या डोंगरांवर पडणाऱ्या किरणांमुळे निसर्गाचं अद्भूत सौंदर्य पहायला मिळेल. जाणून घेऊया या ठिकाणाबाबत काही खास गोष्टी...
'कुंती बेट्टा'च्या आजूबाजूला उसाचे आणि इतर पिकांचे मळे आहेत. याव्यतिरिक्त या डोंगरांच्या चारही बाजूंना हिरवळ आहे. येथे वातावरणही फार उत्तम आहे, दिवसा येथील वातावरणात असलेला गारवा मन प्रसन्न करण्यास मदत करतो.
या डोंगराच्या किनाऱ्यावरचं कुंती कुंड तलाव आहे. जी अत्यंत सुंदर दिसते. जेव्हा संध्याकाळ होते त्यावेळी तलावाच्या पाण्यावर पडणारी मावळत्या सुर्याची सुंदर किरणांमध्ये तलाव अत्यंत सुंदर दिसू लागतो. येथे फिरण्यासाठी येणारे अनेक पर्यटक नेहमी याच तलावाच्या किनाऱ्यावर कॅम्पिंग करतात. याव्यतिरिक्त येथे तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.
(Image Credit : togedr.com)
या जागेला अध्यात्मिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. असं म्हटलं जातं की, वनवासादरम्याम पांडव काही काळासाठी या ठिकाणी थांबले होते. याचदरम्यान कुंती आणि तिची मुलं म्हणजे, पांडवांनी या जागेचा विकास करण्यासाठी महतत्वाची भूमिका निभावली होती. या डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे. जिथे कुंती पुजेसाठी जात असे. त्यामुळेच या डोंगराला कुंती बेट्टा असं नाव देण्यात आलं.