'पायी फिरण्याचा' अनुभव घेण्यासाठी कॅलिफोर्निया, हे अमेरिकेतील पादचारी अनुकूल राज्यांपैकी एक आहे. कॅलिफोर्नियाचे हवामान आपसूकच माणसाला घराच्या बाहेर निघून पायी भटकंती करण्यासाठी प्रवृत्त करत असते. वाइनमेकर्स, खवय्ये, कलाकार आणि विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या या शहरांमध्ये इथल्या गोल्डन स्टेट संस्कृतीचे सुखद मिश्रण पहायला मिळते.
सॅन फ्रांसिस्को
43 टेकड्या असूनही, सॅन फ्रांसिस्को हे पादचाऱ्यांसाठी स्वर्ग आहे. पायी चालणं हे सकाळचा व्यायाम म्हणून उत्तम पर्याय आहे. लहान, सपाट भागांमध्ये हळूहळू पायी चालता येऊ शकते. लाइट रेल किंवा केबल असो, जमिनीवरची किंवा भूयारी रेल्वे असो, सॅन फ्रांसिस्को हे अमेरिकेतील सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक प्रणाली असलेले शहर आहे. जर तुम्ही आरामात पाहणार असाल तर, हे शहर पायी फिरण्यासाठी खूप उत्तम डेस्टिनेशन आहे. वॉक स्कोर, या सिअॅटलच्या कंपनीने अमेरिकेतील 2,500 शहरांच्या चालण्याच्या क्षमतेचे परिक्षण केलं असून या यादीत सॅन फ्रांसिस्को दुसऱ्या क्रमांकावर आहे. बरेच गट आपल्या सहभागींसाठी शटल सेवा पुरवतात, पण जर तुम्ही स्वतःच फिरणार असाल, तर या शहराच्या प्रसिद्ध भागांत फिरण्यासाठी आम्ही काही सूचना सांगणार आहोत. पर्यटकांनी सॅन फ्रांसिस्कोच्या 49 चौरस मैलांच्या छोट्या आकाराच्या भ्रमात पडू नये. नकाशावर पायी चालण्याचे सपाट दिसणारे मार्ग, उंच-सखल आणि खडबडीत ही असण्याची शक्यता आहे. सॅन फ्रांसिस्कोचे काही सर्वात कठीण चढ शहराच्या मध्यभागी आहेत, त्यात नोब हिलची कठीण चढाई आहे. त्यामुळे तुम्ही येथे फिरण्यासाठी जाणार असाल तर चालण्याच्या शूजची एक आरामदायक जोडी सोबत घ्या आणि त्यांना बस किंवा रस्त्यावरच्या कार मध्ये बसण्याची इच्छा असल्यास मनी फेअर ($2) हे नेहमी सोबत ठेवा. बाहेर निघण्यापूर्वी, पर्यटकांनी दिशानिर्देशांसाठी हॉटेल एजंटशी सल्लामसलत करावी, जीपीएस तपासावा किंवा अधिकृत सॅन फ्रांसिस्को व्हिजिटर इन्फॉर्मेशन सेंटर (900 मार्केट स्ट्रीट, हॉलिडी प्लाझाच्या खालच्या बाजूला, जेथे शहराच्या प्रसिद्ध पॉवेल स्ट्रीट केबल कार असतात) येथे संपर्क साधावा. पर्यटकांसाठी नकाशे ही उपलब्ध आहेत आणि ते साहसिक अनुभवांसाठी आणि सर्वोत्तम मार्गांवरुन पायी फिरण्यासाठी ग्राहकांना मदत करतात.
पियर 39 कडे फेरफटका
सॅन फ्रान्सिस्को जगातील सर्वात सुलभ वॉटरफ्रंट्सपैकी एक आहे. एटीएंडटी पार्कपासून सुरु करुन फिशरमॅन व्हर्फ आणि पियर 39 पर्यंत अनेक मार्ग पसरलेले आहेत. पर्यटक विविध सार्वजनिक कलांचा आनंद घेतात, मोठ्या बे ब्रिजच्या पाश्चात्य अँकरच्या खालून चालतात, पियर 14 आणि 7 मधील स्कायलाइनचा आनंद घेतात, एम्बरकेडरो सेंटर किंवा द पीयर्स च्या मधून फिरतात जे पियर 1½ ते 5 पर्यंत पसरलेले आहे आणि तिथे पुनर्जीवित केलेल्या फेरी बिल्डिंगसह अनेक नवीन रेस्टॉरंट्स आहेत, त्यांचा आस्वाद घेतात. पियर 39, सॅन फ्रांसिस्कोमधील सर्वात जास्त फिरण्यात येणारे स्थान आहे. इथे जेवण, मनोरंजन, खरेदी आणि विविध आकर्षणे यांचे दोन स्तर आहेत . हे ठिकाण शहर आणि खाडीच्या सुंदर दृश्यांनी भरलेले आहे.
गोल्डन ब्रिज येथील आश्चर्य
गोल्डन गेट ब्रिजला भेट दिल्याशिवाय सॅन फ्रांसिस्कोची सफर पूर्ण होणार नाही. पर्यटकांनी पायी चालणे किंवा सायकलवर जाणे पसंत केले असले तरी, खाडीच्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे सुंदर ठिकाण सगळ्यांना खूप भावते. यात अल्काट्रॅझ, ट्रेजर आयलँड आणि स्काईलाइनही समाविष्ट आहे. पुलाच्या टिकेटेड टूर देखील उपलब्ध आहेत. कॅमेरा (आकर्षक दृश्ये टिपण्यासाठी) आणि उबदार जॅकेट हे दोन्ही आणण्याचं पर्यटकांनी लक्षात ठेवावं. कारण उन्हाळ्यातही पुलावर थंडी लागू शकते. आणखी एक सुंदर ठिकाण, लिंकन पार्कमधील लीजन ऑफ ऑनर, हे ही या पुलापासून दूर नाही.
सँटा मोनिका
दरवर्षी 7 दशलक्षांहून अधिक पर्यटक सँटा मोनिका येथे येतात कारण ते एक प्रसिद्ध समुद्रकाठी वसलेलं शहर आहे (नॅशनल जिओग्राफिकच्या पहिल्या दहापैकी एक) आणि लॉस एंजेलेसच्या इतर आकर्षणांपासून जवळ ही आहे. सँटा मोनिका बीच दर वर्षी 300 दिवसांपेक्षा जास्त सूर्यप्रकाशात असतो आणि इथे वेस्ट कोस्टवरील काही सुरेख आणि सर्वोत्तम सूर्यास्त पहायला मिळतात . सँटा मोनिका देखील एक चालण्यायोग्य आणि बाइक-अनुकूल शहर म्हणून ओळखले जाते, म्हणून सँटा मोनिका पिअर आणि थर्ड स्ट्रीट प्रमोनेडसारखी आकर्षणे आणि दुकाने, रेस्टॉरंट्स आणि इतर बऱ्याच गोष्टींचा प्रवास करणे सोपे आहे. सँटा मोनिका केवळ 8.3 चौरस मैल एवढा आहे आणि अनेक ठिकाणी अगदी थोड्याच वेळात सहज पोहोचता येते. अनेक रस्त्यांवर मोठी, पादचारी-अनुकूल मार्ग आहेत. रस्त्यावरुन पायी चालणे हा बहुतेक वेळा स्थानिक परिसराला अनुभवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून ओळखला जातो. पादचारी सँटा मोनिका फ्री राइड, म्हणजे गोल्फ कार्ट शैलीच्या कॅबमध्ये देखील जाऊ शकतात जे विल्शर बॉलवर्ड ते मरीन स्ट्रीट आणि समुद्रापासून ते फिफ्थ स्ट्रीट पर्यंतच्या सेवा क्षेत्रामध्ये फ्री लिफ्ट देतात.
आठ परिसरांच्या मध्यातून पायी फेरफटका
सँटा मोनिका सफरीच्या मध्यभागी आठ विशिष्ट परिसर आहेत, आणि त्यातील प्रत्येक परिसर सौंदर्य आणि आकर्षणांनी पुरेपूर भरलेले आहे. फक्त 8.3 चौरस मैलांत पसरलेल्या, सँटा मोनिकाच्या आठ विशिष्ट परिसरात जागतिक दर्जाचे खरेदी करण्याची ठिकाणे, तसेच जेवण्याची आणि मनोरंजनाची ठिकाणे शोधण्यास जास्त वेळ लागत नाही. मोंटाना एव्हेन्यू वर किंवा प्रसिद्ध थर्ड स्ट्रीट प्रमोनेडसह मेन स्ट्रीटवर शॉपिंग टूर करता येते. पिको बोलेवार्ड येथे जेवा, मिड-सिटीच्या कला दृश्यांचा आनंद घ्या किंवा सँटा मोनिका पियर सारख्या महत्त्वाच्या स्थळांना भेट द्या.
बाईकने फिरून स्थानिक संस्कृतीचा आनंद घ्या
सँटा मोनिका सायकलिस्टसाठी स्वर्ग आहे आणि देशातील सर्वात मोठी संपूर्ण बाईक सेवा म्हणजे सँटा मोनिका बाईक सेंटर येथे आहे. सहभागी या क्रियाशील आणि पुरोगामी समुदायाच्या इको-फ्रेंडली जीवनशैलीचा अवलंब करून, एक स्थानिक म्हणून इथे राहू शकतात. बाइक-अनुकूल रस्त्यांवर बाइक लेन आणि मार्ग व्यवस्थित चिन्हांकित केलेले आहेत. 120 पेक्षा जास्त संग्रहालये, कला दालने, चित्रपटगृहे आणि सार्वजनिक कला प्रदर्शन असलेल्या शहरात फिरण्यासाठी बाईक चालवणे हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे.
बेव्हरली हिल्स
बेव्हरली हिल्स हे खरेदी, ख्यातनाम व्यक्तींचे सहजपणे दिसणे आणि मिशेलिन-तारांकित शेफ यांच्यासाठी जगप्रसिद्ध आहे. कमी प्रसिद्ध, परंतु तितकेच मनोरंजक असलेले बेव्हरली हिल्स इथे पाय मोकळे करण्यासाठी आणि कॅलिफोर्नियाच्या स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आनंद लुटण्यासाठी असंख्य संधी आहेत. तर, आपले शूज घाला आणि आपली कार मागे सोडा. बेव्हरली हिल्स हे 5.7 चौरस मैलचे शहर असून इथे बऱ्याच बागा आणि खुल्या जागा आहेत, जे त्याला पादचारी अनुकूल शहर बनवतात. मॉन्टेज जवळ बेव्हरली कॅनॉन गार्डन येथून छान चालत आणि फेरफटका मारत सुरेख भूभाग, सुंदर फव्वारे आणि नयनाभिराम वॉकवेजचा आनंद लुटत त्याच्या शांत भागांतून फिरता येते. बेव्हरली हिल्सची पायी भटकंती करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे काही विशिष्ट टूर घेणे, उदाहरणार्थ 'सीन ऑन स्क्रीन' टूर, म्हणजे चित्रपटांमध्ये पाहिलेल्या आणि पायी अंतरावर असलेल्या सर्व स्थानांना भेट देणे किंवा 'स्वीट ट्रीट' टूर म्हणजे गोड पदार्थ आवडणा-यांसाठी एक मनोरंजक दौरा. यात काही प्रख्यात प्रतिष्ठानांमधील स्वादिष्ट मिठायांचा आस्वाद घेता येतो. एकदा येथे आलात की वाहतुकी साठी सर्वात स्वस्त, प्रभावी आणि सुलभ साधन म्हणजे – पायी चालणे! बेव्हरली हिल्स लहान, सहज चालण्याजोगे आणि पायी चालत उत्कृष्ट अनुभव देणारे आहे.
बेव्हरली कॅनॉन गार्डन्सपासून विल रॉजर्स मेमोरियल पार्कपर्यंत पायी फेरफटका
तर स्वतःला तयार करा आणि दिवस भर आरामात चालत सकाळचा नाश्ता पचवा. बेव्हरली कॅनन गार्डन्स येथे सुरुवात करा. हे माँटेज बेव्हरली हिल्स जवळ स्थित एक सुंदर सार्वजनिक बाग आहे. सुरेख भूभाग, सुंदर फव्वारे आणि नयनाभिराम वॉकवेजने भरलेल्या शांत हिरव्या परिसरातून फेरफटका मारत पुढे जा. जर तुम्ही दूरच्या भागात भटकंती करण्यास तयार असाल तर 'फ्लॅट्स' वर उत्तरेकडे जा.
'फ्लॅट्स' असे योग्य नाव असलेले, या निवासी परिसरातील विस्तृत, सपाट, वृक्ष-रेखांकित रस्ते वॉकर्ससाठी परिपूर्ण आहेत. इथे व्यवस्थितपणे राखून ठेवलेल्या इमारतींचे सौंदर्य बघा, ज्यामध्ये लो-स्लिंग केप कॉड घरे, मोहक फ्रेंच प्रोविंशियल इमारती आणि मध्य-शतकातील आधुनिक शैली, अश्या विविध प्रकारच्या वास्तुशास्त्रीय शैली बघायला मिळतात.
रोडीयो ड्राइव्ह वर भटकंती
बेव्हरली हिल्स खरेदी साठी जगातील सर्वात फॅशनेबल ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. याच्या मध्य भागावर आहे रोडीयो ड्राईव्ह - जगातील सर्वात प्रसिद्ध रस्त्यांपैकी एक. गोल्डन ट्रायंगलच्या आत, जागतिक स्तराचे 100 पेक्षा जास्त स्टोअर आणि हॉटेल्स आहेत. तीनब्लॉक असलेल्या या रस्त्याच्या वैभव आणि मोहकतेत माणूस सहज हरवून जातो. इथे अशा अनेक सुरेख जागा आहेत ज्या सोडव्याशा वाटत नाही.