देशातील तिसरं सर्वात छोटं राज्य म्हणजे, त्रिपुरा. हे राज्य अत्यंत सुंदर असून तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर त्रिपुरा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. असं म्हटलं जातं की, अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी 'त्रिपुर' नावाचा एक राजा राज्य करत होता. त्यामुळे या ठिकाणाचं नाव त्रिपुरा पडलं. तुम्ही येथे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला खास गोष्टी सागंणार आहोत.
नीरमहलमध्ये करा बोटिंग
नीरमहल ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर महल म्हणूनही ओळखलं जातं. नीरमहल अगरताळापासून जवळपसा 53 किलोमीटर अंतरावर असलेल्या रूद्रसागर तलावामध्ये स्थापन केलेलं आहे. 1930च्या दशकामध्ये त्रिपुरा राज्यातील राजांचा शाही निवास म्हणून प्रसिद्ध होता. या महालात वास्तुकलेमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही संस्कृतिंचा मेळ दिसून येतो.
जगन्नाथ मंदिर आणि काली माता मंदिर
जगन्नाथ मंदिर आगरताळामध्ये स्थित असून काली माता मंदिर जवळपास 27 किलोमीटर दूर आहे. जगन्नाथ मंदिर 19व्या शतकातील असून मणिक्य वंशाद्वारे निर्माण करण्यात आलं होतं. तसेच काली माता मंदिर एका डोंगरावर स्थित आहे. मंदिर असलेल्या डोंगरावरून कमलासागर सरोवर पाहता येतो. उंचावरून त्यांचं सौंदर्य आणखी बहरत असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही.
त्रिपुरामधील चवदार पदार्थ
त्रिपुरामधील सर्वात लोकप्रिय आणि पारंपारिक पदार्थ म्हणजे म्यूई बोरोक. तसेच येथील पदार्थांमध्ये बरमाचा वापर केला जातो. जो एका माशाचा प्रकार आहे. त्यामुळे येथे गेल्यानंतर माशांचं स्टू, बांस शूट लोणचं, बांगुई भात या पदार्थांची चव नक्की चाखा.
हेरिटेज पार्कमध्ये फिरा
चार हेक्टर अशा विशाल परिसरात पसरलेलं हेरिटेज पार्क आगरताळामधील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या ठिकाणी त्रिपुरामधील प्रमुख स्थळांच्या छोट्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये नीरमहल, उज्जांता पॅलेस, उनाकोटी यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे.
संत्र्यांचा आस्वाद
जर तुम्हाला झाडावरील ताज्या संत्र्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत येथे जाणं आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये येथे नारंगी उत्सव साजरा करण्यात येतो.
उज्जयंता महाल
1901मध्ये तयार करण्यात आलेला उज्जयंता महाल एकेकाळी शाही निवास्थान म्हणून ओळखला जातो. आता येथे एक संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. इंडो-ग्रीक शैलीमधील हा महाल महाराजा राधाकिशोर माणिक्य यांनी तयार केला होता. रविंद्रनाथ टागोरांनी या महालाचं नाव ठेवलं होतं.
उनाकोटी
त्रिपुरामधील हे ठिकाण ऐतिहासिक स्थळ आहे. येथे दगडांमध्ये कोरण्यात आलेली अनेक शिल्प तुम्हाला पाहायला मिळतील. ही शिल्प येथे 7व्या ते 9व्या शतकात कोरण्यात आलेल्या आहेत.