शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

उन्हाळ्यात इथे वाटेल तुम्हाला थंडा थंडा कूल कूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 4:04 PM

अनेकजण राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य देतात कारण ते स्वस्तात मस्त होतं.

उन्हाळा आला की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फिरायला जाण्याची ओढ लागलेली असते. खासकरून शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेक प्लॅन्स करतात. मग सुरू होतो शोध राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांचा. अनेकजण राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य देतात कारण ते स्वस्तात मस्त होतं. शिवाय राज्यातल्या राज्यात कुठेही पोहोचण्यासाठी वेळही कमी लागतो. पण अनेकांना राज्यातच असलेली थंड हवेची ठिकाणं माहित नसतात. त्याच थंड हवेच्या ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

* महाबळेश्वर :

सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवरील थंड हवेचे हे ठिकाण म्हणजे आरोग्य रक्षणाची इंग्रजांची सोय असलेले ठिकाण होते. सातार्‍याचे महाराज प्रतापसिंह यांनी १८१८ ते १८३० दरम्यान महाबळेश्र्वर हे आरोग्यवृद्धीसाठी विकसित करण्याचे ठरवले. त्यानुसार तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून नियोजित विकास केला. 

महाबळेश्वर पाहताना बॉम्बे पॉइंट, ऑर्थर सीट, केटस् पॉईंट, लॉडविक – विल्सन, एलफिस्टन पॉईंट्स, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, तापोळा, जवळचे श्रीक्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर ही ठिकाणे महत्त्वाची!

* पाचगणी :

पाच डोंगरांवर वसलेले म्हणून पाचगणी असे नाव असलेले हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. हे ठिकाण सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. महाबळेश्र्वरपासून केवळ २० कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य आहे. स्ट्रॉबेरी, तुती, केशरी गाजरे, मध, या सोबतच जॅम – जेली, सरबते तयार करणार्‍या कंपनीच्या उत्तम बागा हेदेखील पाचगणीचे आकर्षण आहे. 

* लोणावळा – खंडाळा :

थंड हवेच्या ठिकाणांत प्रसिद्ध असलेले लोणावळा – खंडाळा हे एक ठिकाण आहे. सुमारे ६२५ मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण पावसाळ्यात जितकं आनंद देणारं आहे, तितकच उन्हाळ्याही दिलासा देणारं आहे. लोणावळा व खंडाळा ही परस्परांच्या जवळ असलेली गावे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुणे व मुंबई या दोन महानगरांच्या मध्ये ही ठिकाणे आहेत. अतिशय सोयीचा प्रवास, निसर्गरम्यता, अनेक सोयी सुविधा, गर्दी व अशांततेपासून सुटकेची खात्री यांमुळे पुण्या-मुंबईतील पर्यटकांबरोबरच संपूर्ण भारतातील पर्यटक येथे गर्दी करतात. 

या दोन्ही ठिकाणांपासून जवळच पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, टायगर्स लिप, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेण्या, लोहगड, विसापूर ही त्यापैकी ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. एम.टी.डी.सी. तर्फेसुद्धा या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

* माथेरान :

कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात ८०० मी. उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. दाट जंगले, डोंगर-दर्‍या, वळणा-वळणांचे घाटांचे रस्ते यांबरोबरच येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. माती, नागमोडी रस्ते, टेकड्या, धबधबे, पठार, मोठेच्या मोठे गोल्फ कोर्स आणि नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे अशी येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. येथे एकूण २५ ठिकाणे (पाईंट्स) पाहण्यासारखी आहेत. माथेरानला येताना पुणे-मुंबई महामार्गावरून, कर्जतकडून येताना आपण सुंदर प्रवासाचाही आनंद लुटू शकतो. ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते मे या कालावधीत सतत पर्यटकांची वर्दळ सुरूच असते. 

* तोरणमाळ :

नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात सातपुडा पर्वताच्या रांगांत सुमारे ११४३ मीटर उंचीवर थंड हवेचे ठिकाण आहे, ते तोरणमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. आदिवासी जमातीचे लोक बहुसंख्येने राहत असलेल्या अक्राणी तालुक्यात हे हिरवेगार असे ठिकाण आहे. पूर्वीच्या मांडू घराण्याच्या राजांचे हे राजधानीचे ठिकाण. महाराष्ट्रातले पर्यटक हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणांकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात असलेल्या तोरणमाळमध्येही अलीकडच्या काळात गर्दी वाढते आहे.

 * चिखलदरा :

सातपुडा पर्वतराजीतील अमरावती जिल्ह्यातील हे एक सुमारे १११८ मीटर उंचीवरचे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प असलेले अभयारण्य व गाविलगडचा किल्ला आहे. साग, बांबू, मोह यासारखी भरपूर झाडे असलेले दाट जंगल आणि घाटांच्या नागमोडी वळणांचा रस्ता असलेले हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेलगतच आहे.

या ठिकाणी कोरकू, गोंड, माडिया इत्यादी जमातींचे लोक मोठ्या संख्येने राहतात. भीमकुंड, आदिवासी वस्तु संग्रहालय, शक्कर तलाव, शिवमंदिर या प्रेक्षणीय ठिकाणांचा, तसेच येथील आदिवासी संस्कृतीचा, त्यांच्या विशिष्ट उत्सवांचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. हे विदर्भातील दुर्मीळ गिरीस्थान आहे, याला ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणतात.

* आंबोली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. सावंतवाडी तालुक्यामधील हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आंबोली हे स्थान सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. डोंगर-दर्‍या, जंगल, धबधबे, समुद्र दिसण्याचे उंच ठिकाण यांचा आनंद आपण येथे घेऊ शकतो.

सुमारे ७०० मीटर उंचीवरील आंबोली येथे महादेवगड पॉईंट, मलईचे जंगल, सनसेट पॉईंट, शिरगावकर – परीक्षित पॉईंट्स, कावळे प्रसादचा कडा, नारायण गड, महादेव गड, नांगरकासा धबधबा – अशी अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. येथील अनेक ठिकाणांहून सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद आपण घेऊ शकतो.

* भंडारदरा :

अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे निसर्गरम्य ठिकाण आहे. प्रवरा नदीचा उगम, भंडारदरा धरण, ऑर्थर तलाव, रंधा धबधबा, अंबरेला धबधबा, अगस्ती ऋषींचा आश्रम, अनेक नैसर्गिक धबधबे अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. ‘कळसूबाई’ हे राज्यातील सर्वांत उंच शिखर याच डोंगररांगेत आहे. प्रवरेवरील भंडारदारा हे धरण भारतातील सर्वांत उंचावरील धरणांपैकी एक असून, देशातील सर्वांत जुन्या धरणांपैकीही एक आहे.

* जव्हार :

हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. उंचावरील स्थान असल्यामुळे येथील हवा दमट नसून थंड व आल्हाददायक आहे. येथील डोंगर-दर्‍या, नैसर्गिक धबधबे, जुना राजवाडा, सूर्यास्त अनुभवण्याचे स्थान अशी अनेक ठिकाणे पाहण्यास मिळतात. जव्हारला येथील हवामानामुळे यथार्थतेने ‘ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हटले जाते.

* कोयनानगर :

सातारा जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी कोयना धरण आणि शिवाजीसागर जलाशय आहे. कृष्णा-कोयना या मोठ्या नद्या कर्‍हाडजवळ परस्परांना मिळतात. कोयना धरणामुळे वीजनिर्मितीचे काम गेली ४० वर्षे होत आहे. विस्तीर्ण जलाशय, नेहरू स्मारक उद्यान, आसपास हिरवीगार दाट झाडी यामुळे हा परिसर अतिशय आकर्षक झाला आहे. कासपठार, ठोसेघर धबधबा अशी जवळची ठिकाणे सहलींसाठी प्रसिद्ध आहेत.

टॅग्स :Travelप्रवास