तुम्ही एकट्याने किंवा मित्रांसोबत फिरायला जाणाचा प्लॅन करत असाल तर उत्तराखंडमधील रानीखेत हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. हे डेस्टिनेशन इतर जागांप्रमाणे मोठं तर नाही पण सुंदर हिल स्टेशन आहे. रोजच्या गर्दीतून बाहेर तुम्हाला शांतता आणि आराम मिळतो. त्यामुळे इथे फिरायला येण्याचा प्लॅन करु शकता.
रानीखेतमध्ये फिरण्यासाठी खास ठिकाणे
झूला देवी मंदिर
या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. असे मानले जाते की, या मंदिरात मागण्यात आलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे मंदिर यातील घंट्यांमुळेही ओळखलं जातं. नवरात्री दरम्यान इथे खास गर्दी असते. दुर्गा देवीचं हे मंदिर रानीखेतपासून साधारण ७ किमी दूर आहे.
बिनसर महादेव
तसे तर इथे अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. पण हे बिनसर महादेव मंदिर सर्वात खास आहे. रानीखेतपासून जवळपास १९ किमी अंतरावर असलेलं हे मंदिर समुद्र सपाटीपासून २४८० मीटर उंचीवर आहे. चोरही बाजूंनी असलेले देवनारची उंचच उंच झाडे मंदिराला सुंदर करण्यासोबतच या मंदिराची सुरक्षाही करतात. हे मंदिर तत्कालीन राजा पीथू यांनी त्यांचे वडील बिंदु यांच्या आठवणीत बांधले होते.
हेरा खान आश्रम
रानीखेतपासून जवळपास ४ किमी अंतरावर असलेल्या चिलियाननौलामध्ये संत हेरा आश्रम आहे. येथून हिमालयाच्या उंचच उंच डोंगरं सहजपणे पाहता येतात. बर्फाने झाकलेली शिखरं बघण्याचा एक वेगळाचं आनंद तुम्ही घेऊ शकता.
गोल्फ कोर्स
दूरदूरपर्यंत हिरव्यागार गवताच्या चादरी रानीखेतमधील हा गोल्फ कोर्स गोल्फच्या शौकीनांसाठी मोठं आकर्षण आहे. याचं दुसरं नाव उपट कालिका आहे. याच्या आजूबाजूला देवदारचं दाट जंगल आहे. ही ठिकाण फोटोसेशनसाठी परफेक्ट मानलं जातं. रानीखेतमधलं हा गोल्फ कोर्स योग्य प्रकारे तयार करण्यात आल्याने जगभरात प्रसिद्ध आहे. आधी याचा वापर आर्मीचे ऑफिसर करत होते, पण आता सर्वसामान्य लोकांसाठी हे ओपन करण्यात आलं आहे.
चोबटिया गार्डन
रानीखेतला येणारे पर्यटक चोबटियाला नक्की भेट देतात. चोबटिया नाव असण्यामागचं कारण येथील चार म्हणजेच रानीखेत, बाहरगांव, पिलखोली आणि देहरिटीचं केंद्र असणे हे आहे. इथे फळांचं एख मोठं रिसर्च सेंटर आहे. ज्यात सफरचंद, अक्रोड, खुबानीसारख्या फळांची अनेक झाडे आहेत.
या ठिकाणाहून हिमालय, नंदादेवी, त्रिशूल, नंदाघुंटी आणि निलकंठच सुंदर नजारे बघायला मिळतात. सोबतच जंगलात फिरण्याचं एक वेगळंच अॅडव्हेंचर आहे. या गार्डनमध्ये साधारण ३६ प्रकारचे सफरचंदाचं उत्पादन घेतलं जातं.
कसे पोहोचाल?
विमान मार्गे - पतंगनगर येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. हे रानीखेतपासून ११५ किमी अंतरावर आहे. एअरपोर्टवरुन रानीखेतला जाण्यासाठी टॅक्सी उपलब्ध आहेत.
रेल्वे मार्ग - काठगोदाम हे येथील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. येथून बस आणि टॅक्सीने रानीखेतला पोहोचता येऊ शकतं.
रस्ते मार्गे - उत्तराखंडमध्ये पोहोचल्यानंतर रानीखेतला जाण्यासाठी टॅक्सी आणि बसेसची अनेक पर्याय आहेत.