शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

पावसाळी ट्रेकला जायचंय... धाकधूक होतेय.. मग या सहा टिप्स वाचा आणि लक्षात ठेवा!

By admin | Published: July 08, 2017 6:20 PM

ज्यांना मनापासून पावसाळी ट्रेकिंगला जायचंय त्यांनी छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या. काळजी घेवून ट्रेकिंग केलं तर पावसाळी ट्रेकिंग हा अविस्मरणीय अनुभव ठरतो.

 

- अमृता कदम

‘पाऊस कोसळतोय, वाटा काहीशा निसरड्या आहेत पण तरीही डोंगरमाथ्यावर पोहचायचंच आहे’. पावसाळ्यात  करणाऱ्यांचा हा नेहेमीचा अनुभव. पावसाळातल्या ट्रेकिंगमध्ये असलेलं थ्रील अनुभवण्यासाठी अनेक हौशी लोक पाऊस पडू लागला की ट्रेकिंगसाठीच्या जागा शोधात. खरंतर अनेकांना पावसाळी टे्रकिंगला जावसं वाटतं पण मनात धाकधूक असते, यातले बारकावे माहित नसतात आणि नुसत्या आवडीवर कोणी साहस करायला धजावत नाही.  पण असं असलं तरी ज्यांना मनापासून पावसाळी ट्रेकिंगला जायचंय त्यांनी छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या. काळजी घेवून ट्रेकिंग  केलं तर पावसाळी ट्रेकिंग  हा अविस्मरणीय अनुभव ठरतो.

 

 

पावसाळी ट्रेकला जा पण एवढी काळजी घ्या..

1. ट्रेकला सूट होणारे बूट

जेव्हा ट्रेकिंग शूजच्या खरेदीला जाल तेव्हा उत्तम क्वालिटीसोबतच आरामाचाही विचार करा. तुमच्या नेहमीच्या साइजपेक्षा एक साइज मोठे लाइटवेट शूज हा ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे. हलक्या वजनामुळे हे शूज चिखलामध्ये रूतत नाहीत. त्यामुळे चालताना त्रास होत नाही. बऱ्याचदा ट्रेकिंग करताना पायांना हलकीशी सूज येते. अशावेळी जर शूज एक साइज मोठा असेल तर पायांना त्रास होत नाही. शूज घेताना उत्तम ग्रिप असलेल्या घोट्यापर्यंत योग्य उंची असलेल्या शूजमधून निवड केली तर फारच चांगलं! कारण पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. पाय हलकासा मुरगळला तरी त्रास होऊ शकतो. म्हणूनच शूजची हाइट विचारात घेणं आवश्यक आहे. या सगळ्या वैशिष्ट्यांसोबतच शूज वॉटरप्रूफ तर असलेच पाहिजेत कारण ही पावसाळ्यातली भटकंती आहे.

 

2.लाइटवेट वॉटरप्रूफ बॅकपॅक आणि पोंचो

मान्सून ट्रेकला जाताना अनेकांकडून होणारी चूक म्हणजे ट्रेकच्या वेळी वजनदार अशा बॅकपॅकचं ओझं बाळगलं जातं. त्यामुळे चढाईच्या वेळेस तर त्रास होतोच पण तुमच्या पाठीचेही हाल होतात. तुमचं हे ओझं लाइटवेट वॉटरप्रूफ बॅगपॅक नक्कीच हलकं करेल. या बॅगेत एक हलका पोंचो किंवा रेनकोट टाकून ठेवा. कारण तुमच्या कपड्यांच्या लिमिटेड सेटमध्ये न भिजता रहायचं असेल तर रेनकोट मस्ट आहे. बॅगेत प्लास्टिकच्या चार पाच पिशव्याही ठेवा. म्हणजे ओले कपडे किंवा सामान वेगळं ठेवता येऊ शकेल. पावसाळी ट्रेकला जाताना कॉटनचे कपडे टाळा. कारण ते सुकायला वेळ घेतात.

3. पावसाळी ट्रेकला सनग्लासेस मस्ट

सनग्लासेस ही उन्हाळ्यातली ट्रॅव्हल क्सेसरी आहे, असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. पावसाळी ट्रेकसाठीही सनग्लासेस गरजेचे आहेत. विशेषत: जेव्हा तुम्ही पर्वतरांगांमध्ये अतिशय उंचावर असाल. पावसाळ्यात आकाश निरभ्र झाल्यानंतरचा सूर्यप्रकाश डोळ्यांना टोचतो आणि त्याची परिणती डोळ्यांतून पाणी येणं, डोकदुखी यामध्ये होते. म्हणूनच आपल्या ट्रेकसाठीच्या सामानामध्ये सनग्लासेस ठेवायला विसरु नका.

 

4.फ्लिप-फ्लॉप्स

तुमच्या बॅगपॅकमधली अजून एक आवश्यक गोष्ट म्हणजे फ्लिप-फ्लॉपचा जोड. ट्रेकिंगदरम्यान तुम्ही मुक्काम करणार असाल तर तुमच्या पायांना फ्लिप-फ्लॉपमुळे आराम मिळेल. या बऱ्याचशा चप्पल वॉटरप्रूफ असल्यामुळे तुम्ही त्या घालून इकडे-तिकडे फिरूही शकता.

5.अँटी-फंगल क्रीम

पावसाळ्यामधलं दमट हवामान हे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीसाठी पोषक असतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स ही अगदी कॉमन गोष्ट असते. फंगल इन्फेक्शन्समुळे सूज येणं, खाज सुटणं असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे सामानामध्ये आठवणीनं अँटी-फंगल क्रीम ठेवावी.

6. आठवणीनं मीठ घ्या !

हो...मीठच! पॅकिंमधली ही बारकाईनं लक्षात ठेवायची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगमधल्या अडनिड्या वाटांवर तुम्हाला जळवांचा सामनाही करायला लागू शकतो. पायावर चढणाऱ्या या रक्तशोषक जळवांना दूर करण्यासाठीचं सहज साधन म्हणजे मीठ. मीठासोबतच लिंबाचा रस बरोबर ठेवू शकला तर खूपच चांगलं. पावसाळी ट्रेक म्हणजे धम्माल मस्ती आणि थ्रील. मात्र ते अनुभवायचं असेल, तर तुमची तयारी नीट झाली पाहिजे. म्हणूनच या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचा मॉन्सून ट्रेक एन्जॉय करा.